घरमहाराष्ट्रनाशिकवॉटरग्रेस कामगारांचा चेंडू कामगार आयुक्तांच्या कोर्टात

वॉटरग्रेस कामगारांचा चेंडू कामगार आयुक्तांच्या कोर्टात

Subscribe

नाशिक : नाशिक महानगर पालिकेची सफाई ठेकेदार असलेल्या ‘वॉटरग्रेस’ कंपनीच्या कामगारांचा संघर्ष सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. कामगारांच्या वेतन प्रश्नी असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने आता यासंदर्भात कामगार आयुक्तांना पत्र दिले असून आता आयुक्त कार्यालयाकडून ठेकेदाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
वॉटरग्रेस कंपनीकडून शहर स्वच्छतेसाठी ७०० कामगारांना नियुक्ती देण्यात आली आहे मात्र या कर्मचार्‍यांना निश्चित करण्यात आलेल्या वेतनातून अर्धी रक्कम ठेकेदार स्वतःच्या खिशात घालत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये असंतोष आहे. याच असंतोषाचा भडका उडाल्याने कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू असून कर्मचार्‍यांना न्याय देण्याऐवजी ठेकेदाराने ४५० कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कारवाईच्या विरोधात कामगार पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कामगारांनी यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्र्कांत पुलकुंडवार यांची भेट घेत तात्काळ कामावर घ्या अन्यथा धरणे आंदोलन करू असा इशारा दिला.दरम्यान कर्मचार्‍यांच्या या आंदोलनामुळे ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शहर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अशोक अश्राम, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आवेश पलोड यांनी कामगारांच्या शेडवर सकाळी ६ वाजता भेट दिली. यावेळी वडाळागाव आणि कलानगर येथील शेडला भेट दिली असता दोनशे कर्मचारी कमी असल्याचे आढळून आले. ७०० पेक्षा कमी कर्मचारी आढळून आल्यास ठेकेदाराला दंड आकारण्यात येणार असल्याची नोटीस महापालिकेच्यावतीने ठेकेदाराला देण्यात आली आहे.

- Advertisement -

ठेकेदारावर मोक्कांतर्गत कारवाई करा

‘वॉटरग्रेस’ कंपनीतील कंत्राटी कामगारास मारहाण करणार्‍या ठेकेदारावर तात्काळ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा अशी मागणी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे करण्यात आली. ‘वॉटरग्रेस’ कंपनीचे ठेकेदार चेतन बोरा यांचे सहकारी कैलास मुदलियार व त्यांच्या माणसांनी शैलेश जाधव, अमित भालेराव व रोहित भालेराव या तीन कामगारांना कंपनीच्या पखाल रोडच्या कार्यालयात बोलावून जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केली. सदर बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून अद्याप पर्यंत सदर ठेकेदारावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. मुदलियार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत लुट, जबरी मारहाण, खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुदलियार व त्याच्या सहकार्‍यांवर तात्काळ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करून ह्या गोरगरीब कामगारांना दिलासा द्यावा अशी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -
आज आंदोलन

बेकायदेशीररीत्या ३५० कंत्राटी कामगारांस कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ या कर्मचारयांना न्याय मिळवून देण्यासाठी कामावरून कमी करण्यात बुधवार (दि.१९) रोजी दुपारी २ ते ५ दरम्यान महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -