घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रऑनलाइन ऑफरमुळे स्थानिक दुकांदारांच्या व्यवसायावर परिणाम

ऑनलाइन ऑफरमुळे स्थानिक दुकांदारांच्या व्यवसायावर परिणाम

Subscribe

प्रमोद उगले । नाशिक

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे क्रेझ वाढत चालले आहे. ग्राहकांना कोणतीही वस्तू सहजासहजी ऑनलाईन पद्वारे खरेदी करता येत आहे. ऑनलाईन प्लॅटफार्मवर ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागल्याने कंपन्यांकडूनही सण,उत्सव काळात ग्राहकांसाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या जातात. अगदी दिव्याच्या वातीपासून ते अगदी चारचाकी वाहनांपर्यंत सर्वच वस्तु ऑनलाइन उपलब्ध झाल्याने ग्राहकांना घरात बसून खरेदी करायला पसंती देत आहेत .

- Advertisement -

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आज प्रत्येक गोष्ट अगदी सहजरित्या स्मार्टफोनच्या एका क्लिकवर खरेदी करत येउ लागल्या. प्रामुख्याने शॉपिंगसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. घरात उपयोगी येणार्‍या वस्तू, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कपडे, स्मार्टफोन्ससह अनेक वस्तू सहज ऑनलाइन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बाजारात जावून खरेदी करण्याऐवजी ऑनलाइन खरेदीख कल वाढू लागला आहे. कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीवर भरघोस सूट जाहीर केल्याने ग्राहक त्यांच्याकडे खेचला जात आहे.या सेलचा परिणाम काही प्रमाणावर का असेना सामान्य व्यापार्‍यांवर होताना दिसत आहे. बाजारात मिळणार्‍या वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचे लक्ष ऑनलाईन शॉपिंगकडे वेधले जात आहे. परंतु ऑनलाईन शॉपिंग सेलमुळे व्यापार्‍यांना त्याचे खूप मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे कापड व्यावसायिक प्रीतम आहेर यांनी आपलं महानगरशी बोलतांना व्यक्त केले .

आकाशकंदील, पणत्या, कपडे,फटाके,इलेक्ट्रॉनिक वस्तु, किरणामाल. या सर्व गोष्टी सामान्य पेक्षा वाजवी दरात ऑनलाइन उपलब्ध आहेत..वस्तु खराब निघल्यास ठराविक वेळेच्या आत ती वस्तु परत करून आपली सर्व रक्कम देखील परत मिळते किंवा ती बदलून दिली जाते.ऑनलाईन शॉपिंगच्या या धोरणामुळे ग्राहकांचे लक्ष त्यांच्या कडे वेधले जात असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -