घरमहाराष्ट्रनाशिक‘नाशिक व्हॅली’च्या माध्यमातून वाईनचे ब्रँडिंग

‘नाशिक व्हॅली’च्या माध्यमातून वाईनचे ब्रँडिंग

Subscribe

‘आयमा’, ‘निमा’सह वाईन उत्पादक एकाच व्यासपीठावर

नाशिक : नाशिकच्या वाईन उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील आयमा, निमा या संघटनांसह ऑल इंडिया वाईन असोसिएशन एकत्रितपणे प्रयत्न करणार असून, ‘नाशिक व्हॅली 2.0’ च्या माध्यमातून नाशिकचे ब्रॅण्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी पर्यटन, सहकार क्षेत्र आणि शिक्षण हब यांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

मुंबई व पुणे या मेट्रो शहरांनंतर नाशिकचे नाव घेतले जाते. रुद्राक्ष ते द्राक्ष असा प्रवास करणार्‍या नाशिक जिल्ह्यात कुंभमेळाही भरतो आणि येथेच वाईनरीचे उत्पादनही होते. त्यामुळे नाशिकच्या ब्रॅण्डींगसाठी सर्व व्यावसायिक संघटना एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत. देशात 4 लाख एकरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. टेबल ग्रेप्स आणि वाईन ग्रेप्स अशा दोन प्रकारे द्राक्षाचे उत्पादन घेतले जात असले तरी शेतकर्‍यांना पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे देशात अवघे 90 वायनरी आहेत.

- Advertisement -

त्यातही सर्वाधिक उत्पादन घेणार्‍या नाशिक जिल्ह्यात अवघे 70 वायनरी आहेत. बहुतांश वायनरी आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विदेशात याउलट परिस्थिती दिसून येते. फ्रान्समध्ये 27 हजार वायनरीस् आहेत. तर इटलीमध्ये 30 हजार, स्पेनमध्ये 22 हजार वायनरी आहेत. या तुलनेत महाराष्ट्र तुलनेने खूप मागे आहे.त्यामुळे विदेशी वाईन आपल्या देशात आयात करण्यासाठी सध्या 150 टक्के शुल्क कमी करुन 40 टक्के करण्यासाठी ‘यूनेस्को’च्या माध्यमातून दबाव टाकत आहे. भारताने आयत शुल्क कमी केले तर देशातील नागरिकांना विदेशी वाईन्स् प्यावी लागेल. या तुलनेत स्वदेशी वाईनला प्रोत्साहन देण्याची हीच योग्य वेळ आहे.

वाईन उद्योजकांना प्रोत्साहन दिले तर पाच हजार कोटींपर्यंत हा व्यवसाय वाढू शकतो, असा विश्वास द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी व्यक्त केला. द्राक्षांसोबत डाळींब, पेरु, जांभळापासूनही वाईन बनवली जाऊ शकते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी नाशिकच्या सर्व उद्योजकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून ‘नाशिक व्हॅली 2.0’च्या माध्यमातून संपूर्ण नाशिकचे ब्रॅण्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यात द्राक्ष उत्पादकांसह वाईनरी, कृषी पर्यटन, शिक्षण व सहकार क्षेत्रातील संघटनांनाही जोडले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

- Advertisement -

द्राक्षाला जीआय टॅगींग मग वाईनला विरोध का?

केंद्र सरकारने द्राक्षाला जीआय अर्थात ग्लायसेमिक इंडेक्स (क्र.46) दिला आहे. म्हणजे द्राक्ष हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असल्याचे यात म्हटले आहे. मग द्राक्षापासून बनवलेल्या वाईनला विरोध कशासाठी? असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकरी विजय घुमरे यांनी उपस्थित केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -