घरमहाराष्ट्रनाशिकयशराज पाटील ठरला नासाचा ग्लोब सुपरस्टार

यशराज पाटील ठरला नासाचा ग्लोब सुपरस्टार

Subscribe

यशराज संदीप पाटील, ग्लोब इंटरनॅशनल स्टेम नेटवर्क जीआयएसएन चा झाला सदस्य

 राकेश बोरा ,लासलगाव : यशराज संदीप पाटील, ग्लोब इंटरनॅशनल स्टेम नेटवर्क जीआयएसएन सदस्य असलेल्या या लासलगावच्या युवकाने हिमालयात विशेषतः लडाख संशोधनाद्वारे जमीन आच्छादन, ढगांचे आवरण, क्षारता यावरची निरीक्षणे दर्शविली. या संशोधनाद्वारे यशराजने जमिनीवरील त्याच्या डेटाची तुलना लँडसॅट, क्लाउडसॅट आणि मेटिओसॅट-8 यांसारख्या मोहिमांमधील डेटाशी केली आहे.संशोधनातील या अभूतपूर्व कामामुळे आणि हिमालयातील विक्रमी निरीक्षणांमुळे नासाने त्यांच्या नुकत्याच नासा नगेट रिलीझमध्ये यशराजला उदयोन्मुख ग्लोब सुपरस्टार म्हणून घोषित केले.
२०२१ च्या भारतातील पहिला पृथ्वी आणि अंतराळ संशोधन कार्यक्रम लडाख येथे पार पडला ह्याचा मूळ उद्धेश हा हिमालयाच्या सायंटिफिक रीतीने अभ्यास करणे, लडाख मधील काही ठिकाणी मार्ससारखे पृष्ठभाग असणे आणि लडाखच्या हिमालयातील जीवसृष्टी जी समुद्रसपाटीपासून १६ हजार फूट वरती काही तुरळक ठिकाणीच आढळलेली आहे आणि विशेष म्हणजे इथली इकॉसिस्टम ही दुसर्‍या इकॉसिस्टमपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यांची सहनशीलता सुद्धा खूप आश्चर्यजनक आहे जे कमी ऑक्सिजन, अति यूव्ही रेडिएशन, तुरळक पाऊस आणि निगेटिव्ह तापनमनात सुद्धा टिकेल अशी ही इकॉसिस्टम आहे.

या सगळ्या संशोधनाबद्दल यशराजने त्याच्या नासा मेंटर्सला कळवले आणि त्यांनी ह्याची दखल घेत यशराजला नासा च्या खास संशोधनाबाबत मार्गदर्शन केले आणि नासाच्या पृथ्वी निरीक्षण मिशन अंतर्गत ग्लोब प्रोग्रॅम यात यशराज जीआयएसएन सायंटिस्ट म्हणून काम करतो त्याचे खास ग्राउंड बेस्ड निरीक्षणे प्रोटिकॉल्स सांगितले ज्याच्या साहाय्याने हिमालयाच्या पृष्ठभागावर अजून चांगल्या रीतीने निरीक्षणे घेता येतील आणि यशराजने रेकॉर्ड ब्रेक ओबसर्वशन नासा/ग्लोब ला सबमिट केले ज्यात ग्लोबला १९९४ नंतर प्रथमच समुद्रसपाटीपासून १७५०० फूट उंच लँड कव्हर, क्लाऊड कव्हर आणि बायोडिव्हर्सिटीचे निरीक्षण आणि डेटा मिळाला जो नासाच्या टेरा आणि एक्वा उपग्रहाच्या स्पेस डेटा सोबत तंतोतंत जुळला आणि इतिहासात हे हिमायलाच पहिला ग्लोब निरीक्षण नासा/ग्लोबला मिळाला.

- Advertisement -

यासोबतच यशराजने युनायटेड नेशन्स स्पेस कॉन्फरन्ससाठी अर्ज केला ज्यामध्ये अर्जदारांपैकी केवळ ३७% अर्जदार निवडले गेले ज्यापैकी केवळ ११६ अर्जदार युनायटेड नेशन्स स्पेस जनरेशन फ्यूजन फोरमसाठी यूएन ग्लोबल डेलिगेट म्हणून उपस्थित राहू शकले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे कोविड प्रतिबंधांमुळे यशराजने ऑनलाइन हजेरी लावली आणि पेंटागॉनचे यूएस स्पेस फोर्स डिरेक्टर ऑफ स्टाफ, युनिटेड स्टेट्स स्पेस फोर्स, व्हाईट हाऊसचे अधिकारी आणि अनेक उच्च प्रोफाइल व्यक्तींशी संवाद साधण्याची उत्तम संधी मिळाली जिथे त्या सर्वांनी अलीकडील अंतराळ आणि कमी पृथ्वी कक्षावर चर्चा केली. या स्पेस कॉन्फरन्सचे काही भाग स्पेनमधील ला-पाल्मा बेटावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या खगोलशास्त्रीय परिषदेत चर्चा करण्यासाठी नियोजित होते जेथे चर्चा पुढे नेण्यासाठी केवळ यशराजची निवड करण्यात आली होती. यशराजला त्याच्या यशाबद्दल यूएस आणि स्पेन या दोन्ही देशांतील भारतीय दूतावासाने त्याचे कौतुक केले आणि कोणतीही अडचण आल्यास सहाय्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -