घरमहाराष्ट्रनाशिकजनता नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांची तक्रार

जनता नागरी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांची तक्रार

Subscribe

केंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची घेतली भेट

 नाशिक : येवला येथील जनता सहकारी पतसंस्थेत 300 पेक्षा अधिक ठेविदारांचे एक कोटी 90 लाख रुपयांच्या ठेवी अडकल्याने या ठेविदारांनी रविवारी (दि. 2) केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची भेट घेतली. पतसंस्थेवर कारवाई करण्याची मागणी करत ठेविदारांचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी त्यांना साकडे घातले.

पतसंस्थेने मनमाड येथील कार्यालय दि. 10 ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे बंद केले आहे. मनमाड शहर व परिसरातील सुमारे 300 पेक्षा जास्त ठेवीदारांचे अंदाजे रुपये रक्कम 1 कोटी 90 लाख रुपयांच्या ठेवी व अल्पबचत गुंतवणुकीची रक्कम देण्यासाठी पतसंस्था टाळाटाळ करीत आहे. यामध्ये सर्वात जास्त जेष्ठ नागरिक, व्यापारी, छोटे दुकानदार यांची रक्कम अडकली आहे. येवला तालुका सहकारी पतसंस्था निबंधक व नाशिक जिल्हा सहनिबंधक यांनीही याकडेे दुर्लक्ष केले आहे.

- Advertisement -

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे यांच्या नेतृत्वात पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मंत्री डॉ. पवार यांची भेट घेतली. संचालक मंडळ ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम अडवत असल्याचे नितिन पांडे आणि जयकुमार फुलवाणी यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. अल्पबचत प्रतिनिधी संदीप सांगळे, प्रदीप धिवर यांनी देखील याप्रसंगी ठेवीदारांच्या अडचणी सांगितल्या. याविषयी वरिष्ठ सहकार अधिकार्‍यांशी बोलून या ठेवीदारांच्या रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी कामगार नेते राजाभाऊ पवार, भाजप मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपचे शहर उपाध्यक्ष बुधन शेख, अनंता भामरे, प्रमोद जाधव, भाजप दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक पगारे, गणेश गंडी, रवींद्र सोनार, संदीप उमाळे, गंगाधर भावे, चेतन सरोदे, मोहन शाकदिपी, कैलास कवडे, प्रवीण जाधव, राम थोरात, धनंजय देशपांडे, प्रियंका धोंडगे आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -