घरमहाराष्ट्रनवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; वऱ्हाड क्वारंटाईन

नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; वऱ्हाड क्वारंटाईन

Subscribe

पनवेल महापालिका भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, पनवेलजवळच्या नेरे गावातील लग्न चांगलच महागात पडलं आहे. नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांना धक्का बसला आहे. हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या ९० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या घटनेने प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

गेल्या १४ जून रोजी नेरे गावातील पाटील कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर २३ जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या ९० जणांची चाचणी केली जाणार आहे. तर नेरे परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्यात ९० पैकी २७ जणांची चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित लोकांची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान २५ जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी या परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करु नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येते, रितसर परवानगी घेऊन लग्नसोहळे करावेत, असं प्रशासनाने बजावलं.

- Advertisement -

हेही वाचा – नागपूरला पर्यटनाचं केंद्र बनविणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत


नवी मुंबईत ७ दिवस लॉकडाऊन

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे नवी मुंबई शहरात ४४ ठिकाणी येत्या २९ जूनपासून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असून सात दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं असून दररोज २०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -