घरताज्या घडामोडीयुवकाची गळा चिरून हत्या

युवकाची गळा चिरून हत्या

Subscribe
जेल रोड भागात अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकाचा गळा चिरून हत्या केल्याची घटना आज(दि.27) रात्री 7.30 वाजता उघडकीस आली. पोलिसांना मृत युवकाची ओळख पटवण्यात यश आले असून सागर संदीप अहिरे (20, रा.शिवाजीनगर, जेलरोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. अजय दीपक जाधव (21), राहुल राहटळ अशी नावे आहेत.
   पोलिसांच्या माहितीनुसार, दसक येथील गोदावरी नदीकाठच्या परिसरात एक युवक मृतावस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना युवकाच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आणखी एकजण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -