घरमहाराष्ट्रनागपूरला पर्यटनाचं केंद्र बनविणार - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूरला पर्यटनाचं केंद्र बनविणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Subscribe

देशातील पथदर्शी 'ऊर्जा शैक्षणिक पार्क' कोराडीत साकारणार जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क, बिझनेस सेंटर आणि न्यू स्टेडियम प्रस्तावित

देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू बनविण्याचा मानस असल्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं. महावितरणच्या ‘ऊर्जा अतिथीगृह’ नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ‘ऊर्जा पार्क’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याने नागपूर जवळच्या कोराडी येथे उर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना उर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने हा ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार पार


ऊर्जा पार्कद्वारे, हरित ऊर्जा, उर्जेच्या विविध स्त्रोतांना आधुनिकतेची जोड देण्यात येणार आहे. ऊर्जा वनस्पतींचे उद्यान, सौर विद्युत व्यवस्था, उर्जेच्या विविध स्त्रोतांचे जसे औष्णिक, जल, वायू, पवन, सौर, बायोमास लाइव्ह मॉडेल्स, सौर चार्जिंग स्टेशन्स, परिसर सौंदर्यीकरण करून हा अभिनव प्रकल्प प्रस्तावित आहे. एकूणच, पर्यटकांच्या दृष्टीने भव्य हनुमान मूर्ती उभारून यामाध्यमातून पर्यटनाचे हब बनविण्याचे प्रस्तावित आहे. फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांचा आराखडा प्राथमिक अवस्थेत असून निधीची तरतूद करून सदर प्रकल्प साकारण्याचा मानस डॉ. राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -