घरमहाराष्ट्रNavneet Rana : नवनीत राणांचे भवितव्य 1 एप्रिलला ठरणार, भाजपाकडे पर्यायी उमेदवार...

Navneet Rana : नवनीत राणांचे भवितव्य 1 एप्रिलला ठरणार, भाजपाकडे पर्यायी उमेदवार तयार

Subscribe

अमरावती : बनावट जातप्रमाणपत्राच्या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून 1 एप्रिलला या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोषी ठरविल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता या प्रकरणी सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देते, यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण त्याआधीच भाजपाकडून अमरावती लोकसभेसाठी इतर उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. (Navneet Rana fate will be decided on April 1, BJP has an alternative candidate ready)

हेही वाचा… Sanjay Raut : शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही, पण…; उमेदवारांबाबत राऊतांचे मोठे स्पष्टीकरण

- Advertisement -

महायुतीत भाजपाने आधीच अमरावतीची जागा आधीच राखीव ठेवली आहे. तर या लोकसभेतून खासदार नवनीत राणा यांनाच उमेदवारी देण्यात येईल, हेही जवळपास निश्चित झाले आहे. पण नवनीत राणा यांचे बोगस जातप्रमाणपत्र प्रकरण न्यायालयात असल्याने भाजपाकडून अद्याप तरी त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर निकाल लागल्यानंतर लगेचच 2 एप्रिलला भाजपा त्यांना उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. यानंतर 4 एप्रिलला त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे. त्यामुळे आता राणा अपक्ष लढणार की भाजपाच्या तिकीटावर लढणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पण त्यांच्या या उमेदवारीला बच्चू कडू यांनी तीव्र विरोध केला आहे. शिवाय शिवसेनेची सत्ता असताना राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला त्रासही वेगळे झाले तरी शिवसेनेच्या नेत्यांना सलतो आहे. राणा दाम्पत्याने उघडपणे शिवसेनेविरोधी वातावरण तापविले होते. यामुळे राणा यांना उमेदवारी देण्यासाठी अनेकांकडून विरोध करण्यात येत आहे. अशातच निकाल नवनीत राणांच्या बाजुने लागला तरच त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. पण, जर का निकाल राणांच्या विरोधात लागला तर, राणा यांच्याऐवजी उद्योजिका कल्पना सरोज यांच्याही नावाचा विचार भाजपाकडून केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. याविरोधात राणा या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. उच्च न्यायालयातील अनेक तारखांना राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -