घरमहाराष्ट्रPolitics : शिरुरमध्येही पवार विरुद्ध पवार लढत; शिवाजी अढळरावांचा अजित पवार गटात...

Politics : शिरुरमध्येही पवार विरुद्ध पवार लढत; शिवाजी अढळरावांचा अजित पवार गटात प्रवेश

Subscribe

मुंबई : माजी खासादर शिवाजीराव अढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अशातच आज (26 मार्च) शिवाजीराव अढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Politics Pawar vs Pawar fight in Shirur too Entry of Shivajirao Adharao Patil into the Nationalist Party)

हेही वाचा – Baraskar Vs Jarange : जरांगेचे उपोषण सोडणाऱ्या महिलेकडे नवी कोरी गाडी कशी आली? बारसकरांचा सवाल

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच अनेक इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. त्यातकील एक शिरुर लोकसभेचे दोन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे (शिंदे गट) नेते शिवाजी अढळराव पाटील हेही होते. त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघावरूनही शिवसेना आणि राष्ट्रावादीत वाद होण्याची शक्यता होती. मात्र आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पार पडलेल्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव अढळराव पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

हेही वाचा – Sanjay Raut : सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे उतरणार बारामतीच्या रिंगणात, राऊतांची माहिती

- Advertisement -

शिरुरमध्येही पवार विरुद्ध पवार लढत

दरम्यान, शिवाजीराव अढळराव पाटील यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. यानंतर अजित पवार यांनी खेडचा दौरा करत दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणली. त्यामुळे अढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आता शिरुरमध्येही पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. कारण शरद पवार गटाने शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -