घरक्रीडाMumbai Indians : हार्दिकला हटवून रोहितला कर्णधार बनवल्यास...; माजी दिग्गजांचे मोठे विधान

Mumbai Indians : हार्दिकला हटवून रोहितला कर्णधार बनवल्यास…; माजी दिग्गजांचे मोठे विधान

Subscribe

मुंबई : माजी कर्णधार रोहित शर्माला हटवत मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे देण्यात आली. परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर हार्दिकच्या कर्णधारपदावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. तसेच सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी सुद्धा हार्दिकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. याशिवाय पहिल्या पराभवानंतर हार्दिक पांड्यााल कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कर्णधार मिळेल का? असाही प्रश्न चाहत्यांना पडला होता. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीने मोठे विधान केले आहे. (Mumbai Indians If Hardik is removed from the captaincy and Rohit is made the captain Big statement from former Australian player Tom Moody)

आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टॉम मूडी म्हणाले की, मुंबई इंडियन्सला पहिला सामना हरल्यावर चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या नव्या कर्णधाराला थोडा वेळ दिला पाहिजे. पाच-आठ सामन्यांनंतर हार्दिकला अचानक कर्णधारपदावरून काढून रोहित शर्माला कर्णधार बनवल्यास आश्चर्य वाटेल. पण मला वाटते की, मुंबई इंडियन्सने खूप पुढे विचार करून हार्दिकला कर्णधार बनवले आहे. हार्दिककडे पूर्ण नेतृत्व क्षमता आहे. त्यामुळे त्याला थोडा वेळ दिला पाहिजे.

- Advertisement -

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात दुखापतीनंतर हार्दिकही मैदानात परतला. मात्र, या सामन्यात हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फ्लॉप ठरला. गोलंदाजी करताना त्याने 3 षटकात 30 धावा देत एकही विकेट घेतली नाही. याशिवाय त्याने फलंदाजी करताना केवळ 11 धावा केल्या. त्याचवेळी माजी कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 45 धावांची केली. याशिवाय सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याने रोहितसोबत केलेल्या वागणुकीमुळे चाहते निराश झाले आहेत. हार्दिक पांड्या रोहित शर्माचा अपमान करत असल्याचे काही यूजर्सचे मत आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही निराशा दिसत होती. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे चाहते हार्दित पांड्याला 27 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुन्हा ट्रोल करतात का? हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -