घरमहाराष्ट्र'सुना है, मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है', नवाब मलिकांचं नवं...

‘सुना है, मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है’, नवाब मलिकांचं नवं ट्विट

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बऱ्याच दिवसानंतर एक सूचक ट्विट केलं आहे. सुना है, मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. या ट्विटची आता चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा घरावर छापे टाकणार आहे, असं नवाब मलिक यांना सांगायचं नसेल ना, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये माझ्या घरी आज, उद्या सरकारी पाहुणे येणार असल्याचं ऐकलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करु. आम्ही घाबरणार नाही, लढणार असं देखील मलिक म्हणाले आहेत. “साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से,” असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -

नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. नवाब मलिक यांच्याविरोधातील पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देणार असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर कोणत्या तपास यंत्रणा मलिक यांच्या घरावर छापे मारणार आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

- Advertisement -

मलिकांचा हायकोर्टात बिनशर्ती माफीनामा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. लेखी हमी देऊनही अनावधानानं वानखेडेंबद्दल वक्तव्य केल्याबद्दल मलिकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणतेही वक्तव्य करणार नाही अशी हमीही त्यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिकांचा माफीनामा स्विकारला. न्यायालयाला नवाब मलिकांनी पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नसल्याची हमी दिली होती. पण सोमवारी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मलिकांनी समीर वानखेडे ‘चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे’ अशी टीका केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मलिकांना सुनावलं आहे. वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी देऊनही टीका केल्याने मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. याप्रकरणी नवाब मलिकांनी हा माफीनामा सादर केला आहे.


हेही वाचा – Malik vs Wankhede : नवाब मलिकांचा बिनशर्थ माफीनामा, वानखेडेंविरोधी वक्तव्य भोवले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -