घरताज्या घडामोडीमला पुतण्या म्हणून भीती वाटते, रोहित पवारांना अजितदादांची चिंता

मला पुतण्या म्हणून भीती वाटते, रोहित पवारांना अजितदादांची चिंता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाल्यामुळे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विरुद्ध अजित पवार असा संघर्ष राष्ट्रवादीत निर्माण झालाय. पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसत आहे. परंतु आमदार रोहित पवार यांनी आपले काका म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भीती व्यक्त केली असून काळजी अल्याचे दाखवलं आहे. शरद पवारांनी अजितदादांविरोधात शड्डू ठोकलाय तर दुसरीकडे रोहित पवारांनी अजितदादांची काळजी वाटत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यापासून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांची एकमेकांवर टीका सुरु झाली आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना काका अजित पवार यांच्याबद्दल काळजी वाटत असल्याचे म्हटलं आहे. पुतण्या म्हणून मला एक भीती वाटते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अजितदादा गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजितकाका लोकनेते आहेत. भाजपची प्रवृत्ती आहे की, लोकनेत्याला जवळ करतात आणि त्याचे राजकीय व्यक्तीला संपवतात, तसेच ते आपल्या पार्टीतील नेत्यांनाही संपवतात. दादांचा प्रशासनातील वचक आहे. ते चांगले असताना भाजपसोबत गेल्यामुळे विचार संपलाय. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्याची काळजी रोहित पवारांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हसन मुश्रीफांचा लेखाजोखाच मांडला

आमदार रोहित पवार राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायाल मिळत आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा लेखाजोखा रोहित पवारांनी पोस्ट करुन मांडला आहे. धर्मांध महाशक्तीने यंत्रणांचा वापर करत त्रास देऊनही मंत्री हसन मश्रीफ आता या शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ते आता खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा वैचारिक वारसा विसरले आहेत. अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.


हेही वाचा : Sharad Pawar : गडी काय हे तू पाहिलंच नाही; वयाच्या टीकेवर शरद पवारांचा अजितदादांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -