घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी होणार?

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी होणार?

Subscribe

अजित पवार यांच्याविरोधात मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रोष

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच भूकंप झाला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधीनंतर अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अजित पवारांवर पक्षाकडून त्वरीत कारवाई करून त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बैठक घेणार असून अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल, असे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

आजच्या राजकीय परिस्थितीमुळे अजित पवार यांच्याविरोधात मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे. मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने ते आक्रमक होऊन कार्यकर्त्यांनी ‘शरद पवार जिंदाबाद… अजित पवार मुर्दाबाद’अशा घोषणा देखील दिल्यात.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली हे तर निश्चितच होते. मात्र आता पक्षासोबत पवार कुटुंबातही फूट पडल्यांचे स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत सांगितले आहे. ‘पक्ष आणि कुटुंब फुटले’ असे स्टेट्स व्हॉट्सअॅपवर सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे.

असे होते स्टेटस

पवार कुटुंबात आता फूट पडली असल्याच स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले आहे. पवार कुटुंबात फुट पडल्याचं त्यांनी याद्वारे म्हटले आहे. पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवल्याने पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचे स्पष्ट होत आहे.


अखेर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीत फूट!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -