घरमुंबईराष्ट्रवादीच्या 'त्या' आमदारांनी सांगितला सकाळचा घटनाक्रम!

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांनी सांगितला सकाळचा घटनाक्रम!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राजभवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपालांना सादर केलं. मात्र, या आमदारांना फसवून राजभवनावर नेण्यात आलं होतं असं आता समोर येत आहे. प्रत्यक्ष या आमदारांनीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हजर राहून सकाळपासूनचा घटनाक्रम, अजित पवारांचा त्यांना गेलेला फोन, त्यांना राजभवनावर गाडीतून नेण्यात आल्याचा प्रकार या सगळ्या बाबी या आमदारांनी स्पष्ट करून सांगितल्या आहेत.

नक्की काय घडलं राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत?

आमदार डॉ. शिंगणे यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. ‘मला सकाळी ७ वाजता अजित पवारांनी बंगल्यावर बोलावलं होतं. त्यावेळी तिथे आधीच ७ ते ८ आमदार उपस्थित होते. अर्ध्या तासानंतर मुंबईत इतर ठिकाणी चर्चेसाठी जायचंय असं सांगून आम्हाला गाडीत बसवण्यात आलं. पण दुसरीकडे कुठे न नेता थेट राजभवनावर नेण्यात आलं. तिथे जाण्यापूर्वी आम्हाला कल्पनाच नव्हती की कुठे जायचं आहे. राजभवनावर पोहोचल्यानंतर तिथे आधी देवेंद्र फडणवीस आले. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील देखील आली. त्यानंतर राज्यपाल साहेब आले आणि लगेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला. या सगळ्याची अजिबात कल्पना आम्हाला नव्हती. त्यामुळे तो शपथविधी झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांकडे गेलो आणि त्यांच्याकडे भूमिका मांडली. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच आहोत’, असं शिंगणे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे आमदार संदीप क्षिरसागर यांनी देखील प्रतिक्रिया देताना, ‘अजित पवारांनी फोन केला. राज्यपाल भवनात जाईपर्यंत आम्हाला लक्षात आलं नाही. बाहेर आल्यानंतर आम्ही ठरवलं की पवार साहेबांसोबतच जायचं’, असं सांगितलं.


हेही वाचा – चंद्रकांत पाटलांसह भाजपचे ३५ आमदार आमच्या संपर्कात-संजय राऊत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -