घरमहाराष्ट्रअखेर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीत फूट!

अखेर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीत फूट!

Subscribe

पवार कुटुंबात आता फूट पडली असल्याच स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवलं आहे. पवार कुटुंबात फुट पडल्याचं त्यांनी याद्वारे म्हटलं आहे.

- Advertisement -

पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणालं आहे.

शुक्रवारी रात्री पर्यंत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरु असताना अचानक आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रातील सत्ताकारणात वेगळे वळण आले आहे.

- Advertisement -

हा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी ट्विट करत महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्ही नेते उत्तमरित्या काम करतील, अशी आशा देखील व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे २४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -