घरमुंबई'भाजपनं निर्लज्जपणाची सीमा ओलांडली', काँग्रेस कायदेशीर लढ्याच्या तयारीत!

‘भाजपनं निर्लज्जपणाची सीमा ओलांडली’, काँग्रेस कायदेशीर लढ्याच्या तयारीत!

Subscribe

राजभवनावर शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यावर आता हे तिन्ही पक्ष एकवटले असून त्याविरोधात जोरदार लढा देण्याची तयारी या पक्षांनी केली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेसची जाहीर पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची देखील भूमिका स्पष्ट केली. ‘निर्लज्जपणाची देखील एक सीमा असते. यांनी तर निर्लज्जपणाची सीमा देखील ओलांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही त्यांना पराजित करू’, असं अहमद पटेल यांनी यावेळी सांगितलं.

‘ही घटना राजकारणात काळ्या अक्षरांनी लिहिली जाईल’

‘आज सकाळी कोणत्याही बँड-बाजाशिवाय जो शपथविधी झाला, ती घटना महाराष्ट्राच्या राजकाणार काळ्या अक्षरात लिहिली जाईल. कोणतीही खातरजमा न करत ज्या पद्धतीने एका नेत्याने सादर केलेल्या यादीवर कुणाशीही न बोलता विधिवत शपथविधी व्हायला हवा होता, तो झाला नाही. सकाळी कुणालाही न सांगता शपथविधी करण्यात आला. त्यातूनच असं दिसतंय, की काहीतरी चुकीचं घडलं आहे. महाराष्ट्रातली जनता संविधानाला मानणारी आहे. त्याचा अपमान करून जे काही घडलं, ते राज्यघटनेचा अपमान करणारं आहे. निर्लज्जपणाची एक सीमा असते. यांनी तर ती सीमाच ओलांडली’, असं अहमद पटेल पत्रकार परिषदेत बोलले.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांनी सांगितला सकाळचा घटनाक्रम!

‘काँग्रेसकडून उशीर झालेला नाही’

‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक प्रक्रिया सुरू होती. काल संध्याकाळपर्यंत एक-दोन मुद्दे असे होते, त्यावर आज दुपारी आम्ही भेटणार होतो. पण त्याआधीच सकाळी जे घडलं, त्याची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आमच्याकडून अजिबात उशीर झाला नाही. उद्धव ठाकरेंचा फोन सोनिया गांधींना फोन गेला आणि आम्ही प्रक्रिया सुरू केली. विश्वासदर्शक ठरावामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. भाजपला आम्ही नक्कीच हरवू. आमची बैठक इथे ठरली होती. आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद होईल असं देखील सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही वायबी सेंटरला नव्हतो. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. आम्ही सरकार बनवणार. आम्ही याविरोधात राजकीय आणि कायदेशीर लढा देखील देणार आहोत’, असं देखील पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -