घरमहाराष्ट्रनाशिकAmol Kolhe : अमोल कोल्हेंना पाडण्याचा काहींनी विडा उचललाय..., Jayant Patil यांची...

Amol Kolhe : अमोल कोल्हेंना पाडण्याचा काहींनी विडा उचललाय…, Jayant Patil यांची अजित पवार यांचे नाव न घेता टोलेबाजी

Subscribe

शिर्डी : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) 2 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जंयत पाटील बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीचे वर्ष हे संघर्षाचं वर्ष आहे. पक्ष फुटल्यामुळे मागच्या फळीतील लोक पुढं आले आहेत. त्यांना मागच्या फळीतून पुढच्या फळीत येऊन बसण्याची संधी मिळाली आहे. नाहीतर तुम्हाला काय पुढे येऊन बसायची संधी नव्हती. त्यामुळे पुढे बसलेल्या सर्वांनी गेलेल्यांचे आभार माना. शरद पवारांची साथ न सोडता काम करण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. दोन दिवसाच्या शिबिरात देशाची परिस्थिती काय हे समोर आणणार. असं पाटील म्हणाले.

यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच नाव न घेता निशाणा साधाला आहे. जयंत पाटील म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात पुणे जिल्ह्या जन आक्रोश मोर्चा काढाला होता. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पण काहींनी अमोह कोल्हेंना पाडण्याचा विडा उचललाय. शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे. असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Awhad On Ajit Pawar : आव्हाडांचा अजित पवारांवर थेट हल्ला; म्हणाले- ‘धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा’
नवाब मलिक यांच्यावर आलेला प्रसंग आपल्याला माहिती आहे. अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागलं. शाहु-फुले-आंबेडकरांचा आदर्श आम्ही मानतो. शरद पवार यांनी हेच विचार मनात बाळगले आहेत. शाहूंनी आरक्षणाची भूमिका मांडली होती. मागे पडलेल्यांना त्यांनी पुढे आणलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी या सर्वांचे विचार एकत्र आणण्याचं काम करुन संविधानाचं योगदान दिलं. असंही दे म्हणाले.

आपलं काम इतरांपेक्षा सोपं आह. लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण ताकदीने काम करायला हवं. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काहीजण उचलायला लागलेत. अमोल कोल्हे सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे. जनता आपला निर्णय घेत असते. असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -