घरमहाराष्ट्रइंधन दरवाढीवर मौन सोडा; अक्षय नंतर आता बीगबी आव्हाडांच्या रडारवर

इंधन दरवाढीवर मौन सोडा; अक्षय नंतर आता बीगबी आव्हाडांच्या रडारवर

Subscribe

अभिनेता अक्षय कुमार नंतर आता बीग बी अमिताभ बच्चन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या रडारवर आले आहेत. इंधन दरवाढीवरून आता अमिताभ बच्चन यांना घेरलं आहे. काल अक्षय कुमारला इंधन दरवाढीवरुन प्रश्न विचारला होता. आज अमिताभ बच्चन यांना तुम्ही आता पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? असा सवाल केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी २४ मार्च २०१२ रोजी इंधन दरवाढीवरुन सरकारची खिल्ली उडवणारं ट्विट केलं होतं. हे ट्विट आव्हाडांनी रिट्विट करत त्यांना सवाल केला आहे. “तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? तुमच्या हातात येणारं इंधनाचं बिलही तुम्ही पाहत नाही का? आता तुम्ही बोललंच पाहिजे. हीच ती वेळ आहे. तुम्ही निश्चितच पक्षपाती नसाल, असा चिमटाही आव्हाड यांनी बच्चन यांना काढला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये?” असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबासाठी गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी बच्चन यांना त्यांच्या २४ मे २०१२ च्या एका ट्विटचीही आठवण करून दिली आहे. तेव्हा पेट्रोल ७.५ रुपयांनी महागलं होतं. त्यावर अमिताभ यांनी एक जोक ट्विट केला होता. पेट्रोल विक्रेता म्हणतो, कितीचं पेट्रोल टाकू. त्यावर वैतागलेला मुंबईकर म्हणतो, दोन-चार रुपयाचं पेट्रोल कारवर टाक. कार जाळायची आहे. अमिताभ यांनी या ट्विटमधून तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारवर खोचक टीका केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -