घरताज्या घडामोडी'रिक्षावाला' प्रकरण व नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

‘रिक्षावाला’ प्रकरण व नाना पटोलेंच्या अनुपस्थितीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

Subscribe

प्रत्येक सभेला सर्वच उपस्थित असतील असे नाही. या सभेसाठी काही धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षातील दोनच नेते बोलतील. त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक वडिलधारी, मान्यवर आहेत. त्यामुळे सर्वांनाच बोलायला मिळेल असे नाही. तसेच, दोन तासांत सभा संपवायची असे आमचे नियोजन होते.

प्रत्येक सभेला सर्वच उपस्थित असतील असे नाही. या सभेसाठी काही धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षातील दोनच नेते बोलतील. त्यामुळे प्रत्येक पक्षात अनेक वडिलधारी, मान्यवर आहेत. त्यामुळे सर्वांनाच बोलायला मिळेल असे नाही. तसेच, दोन तासांत सभा संपवायची असे आमचे नियोजन होते. शिवाय, राहुल गांधी सुरतला जाणार होते. त्यामुळे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात भाषण करून गेले. त्यामुळे यावर चर्चा करण्यासारखे काही नाही. वज्रमूठ ही आमची भूमिका आहे. (NCP Leader Ajit Pawar explanation on the Rickshawala case and the absence of Nana Patole)

खासदार अरविंद सावंत यांनी सरकार स्थापन करताना कोण होणार मुख्यमंत्री अशी चर्चा होती. त्यावेळी पवाराांच्या नावाचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी घ्यावी, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. रिक्षावाला हा शब्द माझा होता शरद पवारांचा नाही, मी शब्द मागे घेतला. उद्धवजी काय बोलेल मला एकाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, असा खुलासा स्वत: अरविंद सावंत यांनी केला.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची

गेल्या काळात उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळं आजही ते ताठ बसता येईल अशी खुर्ची वापरतात. त्यामुळं सभेच्या ठिकाणी देखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. बाजूला दोघांसाठी सोफ्याच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यामुळं यामध्ये खुर्चीबाबत भेदभाव केलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी या वादावर दिलं आहे.

- Advertisement -

लोकांचा प्रतिसाद उत्तम

महाविकास आघाडीच्या सभेला चांगली गर्दी होती. लोकांचा प्रतिसाद उत्तम होता. पहिल्या भाषणापासून शेवटच्या भाषणापर्यंत लोक थांबलेले होते. दुसरी सभा नागपूरला होणार असून तिसरी सभा १ मे रोजी मुंबईत होणार आहे. तसेच, चौथी सभा पुण्याला होणार आहे. त्यानंतर नाशिक, कोल्हापूर आणि शेवटची अमरावतीला सभा होणार आहे.


हेही वाचा – यूपी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुघलांचा विषय बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -