घरमहाराष्ट्रबोम्मईंची धमकी, तरीही रोहित पवार पोहोचले बेळगावात...

बोम्मईंची धमकी, तरीही रोहित पवार पोहोचले बेळगावात…

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण पेटले आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रक्षोभक विधान करत वातावरण आणखी तापवण्याचे प्रयत्न केले. यात महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांनी बेळगावात थेट न येण्याचा इशारा दिला होता. मात्र बोम्मईंच्या धमकींना न घाबरता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बेळगावात धडकले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सकाळी अचानक बेळगावात दाखल झाले आहेत. बेळगावात दाखल होताच रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे.

- Advertisement -

रोहित पवार यांनी बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन उद्यानातील मराठी अस्मितेचे मानबिंदू, आपले आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी त्यांच्यासोबत रमाकांत कोंडुस्कर दादा व स्थानिक मराठी बांधव देखील उपस्थित होते. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या येळ्ळूर गावास भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

- Advertisement -

 

सोबत सीमा लढ्यातील जेष्ठ नेतृत्व, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष मा.दिपक दळवी साहेब यांची बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. याशिवाय बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले. अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या बेळगाव दौऱ्याचे फोटो आणि काही व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असताना आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या इशारानंतरही रोहित पवार बेळगावात पोहचल्याने त्यांच्या बेळगाव दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. बेळगाव दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात भेट देत कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनात हुतात्म पत्करलेल्यांना अभिवादन केले. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशी देखील त्यांनी चर्चा केली, हा आपल्या अस्मितेचा लढा असल्याची भावना सर्वांनी बोलून दाखवली आणि त्या भावनेशी मी सहमत आहे, असं रोहित पवार यांनी सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. यानंतर राज्यभरात महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटू लागले. यानंतर बोम्मईंनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात न येणाच्या इशारा दिला होता. अशा परिस्थितीत बेळगावात कन्नड रक्षक वेदिके संघटनेने महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला केला. यामुळे हा तणाव आणखी वाढत गेला, तसेच दोन्ही सीमा समन्वयमंत्र्यांनी देखील बेळगाव दौरा स्थगित केला. मात्र ही वादाची परिस्थिती निवळलत नाही तोवर आमदार रोहित पवार यांनी कर्नाटक सरकारला न जुमानता आज थेट बेळगाव दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारने वाद थांबवाव अन्यथा मला बेळगाव मध्ये जाव लागेल, असा थेट इशारा होता. यानंतर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी थेट बेळगाव मध्ये जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.


राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे, कोकण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -