घरमहाराष्ट्रराजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा यासाठी ग्रंथ भेट

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा यासाठी ग्रंथ भेट

Subscribe

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सर्व खासदारांना इंग्रजी भाषेतील शाहू ग्रंथ पाठवला.

समता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या राज्याचा खजिना रिता करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. शाहू महाराजांच्या पुरस्काराला खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी सर्व खासदारांना इंग्रजी भाषेतील ‘शाहू ग्रंथ’ भेट दिला आहे. देशातील सर्व खासदारांना शाहू महाराजांचे कार्य समजावे, या मागणीला पाठिंबा देत खासदारांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा, अशा विनंतीचे पत्रही त्यांनी दिले आहे. आपल्या फेसबुक पेजवर महाडीक यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी खासदार धनंजय महाडिक हे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आले आहेत. आता इतर खासदारांचाही पाठिंबा मिळवण्यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित इंग्रजी शाहू गौरव ग्रंथ दिवाळीनिमित्त भेट म्हणून पाठवला आहे.

- Advertisement -

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना " भारतरत्न " देऊन सन्मानित करावे यासाठी संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न…

Posted by Dhananjay Mahadik MP Kolhapur on Saturday, 10 November 2018

 

- Advertisement -

खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत यापुर्वीदेखील हा प्रस्ताव मांडलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील लोकसभेच्या अधिवेशनात मांडलेली आहे. शाहू महाराजांना लवकरात लवकर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, यासाठी कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठित व्यक्तिंनी देखील पुढाकार घ्यावा आणि पंतप्रधानांना पत्र लिहावे, अशीही मोहीम महाडिक यांनी सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -