घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीने 'भगवा' झेंडा स्वीकारला; शिवस्वराज्य यात्रेत पक्षाचे परिवर्तन

राष्ट्रवादीने ‘भगवा’ झेंडा स्वीकारला; शिवस्वराज्य यात्रेत पक्षाचे परिवर्तन

Subscribe

“छत्रपती शिवाजी महाराज ही कुणा एकाची जहागिरी नाही. काही पक्षांनी मुंबईत बसून महाराष्ट्रातील जनतेला चुकीचे शिवाजी महाराज दाखवले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, असा नारा देत फक्त खंडणी वसूल करण्याचे काम केले. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आपल्या प्रत्येक सभेला लावायचा.”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा पुरस्कार केला होता. १० जून १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हापासून घड्याळाचे चिन्ह असलेला हिरव्या आणि भगव्य रंगातील झेंडा प्रत्येक सभेला लावला जात असे. मात्र यापुढे राष्ट्रवादी भगव्याचा देखील स्वीकार करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगाव बॉम्बस्फोटानंतर पहिल्यांदा भगवा दहशतवाद असा शब्द वापरला होता. या शब्दावरून शिवसेना आणि भाजपने त्यांच्यावर टीका देखील केली होती. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा माननाऱ्या राष्ट्रवादीने आता काळानुसार आपल्यात बदल करायला सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांचा असून तो राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबतही दिसायला हवा, असेच अजित पवार यानी पाथरी येथे घेतलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सांगितले आहे.

- Advertisement -

शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा चेहरा वापरून राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली. या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवमतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने देखील शिवछत्रपतींच्या नावाचा वापर करत निवडणुकीचे कॅम्पेन राबविले होते. अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी शिवनेरी येते भगवा हातात घेतला, त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही भगवा स्वीकारला आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांमध्ये परिवर्तन झालेले पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -