घरक्राइमवर्षभरापासून नाही मिळाला 'श्रद्धा'च्या शरीराचा एकही अवशेष; बापाला लेकीच्या अंत्यसंस्काराची प्रतीक्षाच

वर्षभरापासून नाही मिळाला ‘श्रद्धा’च्या शरीराचा एकही अवशेष; बापाला लेकीच्या अंत्यसंस्काराची प्रतीक्षाच

Subscribe

संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

मुंबई : बहुचर्चित अशा श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावाला अटकेत आहे. असे जरी असले तरी श्रद्धा वालकरच्या शरीराचा एकही अवशेष तिच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे अद्यापही तिच्या कुटुंबीयांना तिच्या अंत्यसंस्काराची प्रतीक्षा आहे. तेव्हा लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या अशी आर्त साद श्रद्धा वालकर हिच्या वडिलांना पोलीस प्रशासनाला घातली आहे. (Not a single remains of Shraddhas body was found for a year The father is waiting for the funeral of the daughter)

संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मुळ मुंबईतील वसईतील रहिवासी असलेली 28 वर्षीय श्रद्धाची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने निर्घृण हत्या केली होती. एक नव्हे तर श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून ते गुडगावच्या जंगात फेकत होता. ही घटना 14 नोव्हेंबर 2022 रोजी उघडकील आली होती. या घटनेनंतर आरोपी आरोपी आफताब पुनावाला याला अटकही करण्यात आली होती. सध्या तो अटकेत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PM मोदींनी फायटर प्लेन तेजसमधून केले उड्डाण; म्हणाले- आम्ही कुठेही कमी नाही

त्याला नराधमाला फासावर लटकवा

श्रद्धा वालकर हिची हत्या करणाऱ्या आफताब पुनावाला हा जरी अटकेत असला तरी ज्याप्रमाणे त्याने श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केली, जशा वेदना तिला झाल्या असतील त्याहून अधिक प्रमाणा त्याला वेदना होणारी शिक्षा द्या, त्याला फासावर लटकवा अशी मागणी मृतक श्रद्धा वालकर हिचे वडील वडील विकास वालकर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : COVID Returning in 2024: कोविड-19 पुन्हा परतणार ? वाचा सविस्तर

आरोपी आफताबवर आरोपी निश्चित

बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला अटक करून त्याच्यावर आरोपी निश्चित करण्यात आले आहेत. श्रद्धाची हत्या करुन पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आफताबवर ठेवण्यात आला आहे. श्रद्धाच्या वडिलांनी खुलासा केला की, आफताबने छतरपूर परिसरातील 100 फूट रोडवरील स्मशानभूमी मंदिराजवळ ज्या ठिकाणी श्रद्धाला मृतदेहाचे तुकडे फेकले होते, त्याच ठिकाणी आफताबने नेले. नंतर दिल्ली पोलिसांना त्या ठिकाणी श्रद्धाच्या हाडांसह सुमारे 13 तुकडे सापडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -