घरमहाराष्ट्रEknath Khadse : रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत; एकनाथ...

Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

Subscribe

मुंबई : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातल्या 20 जणांची नावं आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांची सून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात गुरुवारी बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर आज एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येत रावेर मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Neither I nor Rohini Khadse are candidates from Raver constituency Eknath Khadse told the reason)

 हेही वाचा – Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

- Advertisement -

एकनाथ खडसे म्हणाले की, मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढू शकत नाही. मला डॉक्टरांनी अजून निवडणूक लढण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी रावेर मतदारसंघातून उमेदवारी करू इच्छित नाही. रोहिणी खडसे यांनी रावेर मतदारसंघातून उमेदवार म्हणून कधीही विचार केला नव्हता. निव्वळ विधानसभा लढवायची या हेतूने गेल्या 4 ते 5 त्या काम करत आहेत. रोहिणी खडसेसुद्धा रावेर मतदारसंघाच्या उमेदवार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे म्हणाले की, रावेरची जागा राष्ट्रवादीला आहे आणि पक्षातून 7 ते 8 उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आहे. प्रत्येकाला त्यासंदर्भात माहिती देण्यात आली. 7 ते 8 उमेदवारांपैकी काहींची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांशी उद्या होईल, असं मला वाटतं असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

 हेही वाचा – Supriya Sule : हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी सुप्रिया सुळे, अजित पवार गटाला दिला इशारा

उद्या निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे, तर महाविकास आघाडीचं जागावाटत कसं असेल? असा प्रश्न एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून 48 जागावाटपांवर चर्चा झाली आहे. फक्त 4 ते 6 जागांवर अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. 48 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे राहतील. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहली तर राज्यातील जनता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारवर नाराज आहे. या नाराजीचा फायदा आम्हाला लोकसभा निवडणुकीत होईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

रावेरमध्ये चुरशीचा सामना होईल

रावेरमधून खडसे विरुद्ध खडसे असा संघर्ष होऊ नये म्हणून भाजपाने रोहिणी खडसे यांनी उमेदवारी दिली का? या प्रश्नावर एकनाथ खडसे म्हणाले की, अशा अनेक कथा आता जन्माला येतील, त्यामुळे अशा कथांवर विश्वास ठेवू नका. कोणता उमेदवार द्यायचा हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. परंतु राष्ट्रावादीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर सामना चुरशीचा होईल आणि त्याठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल. त्या स्वरुपाचा उमेदवारी आम्ही उद्या देणार आहोत, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -