घरमहाराष्ट्र'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सेनेला धक्का, भाजपमध्ये जाणाऱ्यांची यादी तयार'

‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सेनेला धक्का, भाजपमध्ये जाणाऱ्यांची यादी तयार’

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा

आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गेली ३५ वर्षे शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. दरम्यान, आता शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दरम्यान, शिवसेनेचे अनेक नेते निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये येणार असून नावांची यादी तयार आहे, असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेस राणे यांनी एका वृत्संस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. अनेक नेत्यांची यादी तयार आहे. केवळ देवेंद्र फडणवीस, लोढा यांनी टीक करणं बाकी आहे, असं नितेश राणे म्हणाले. पुढे नितेश राणे यांनी महाविकास आघाडी मूळ शिवसैनिकांना आवडली नसल्याचा देखील दावा केला. हिंदुत्ववादी शिवसैनिकांना हे पटलं नाही. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली आहे. मग प्रचारात दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील असं म्हणत नितेस राणे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला.

- Advertisement -

राणेंवर पालिकेची धुरा दिल्याची अधिकृत माहिती नाही

नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, नितेस राणे यांनी यावर बोलताना राणेंवर महापालिकेची धुरा दिल्याची कुठलीही अधिकृत माहिती नाही, असं नितेश राणे म्हणाले. नारायण राणे यांना मुंबईच्या राजकारणाबद्दल प्रचंड अनुभव आहे. ते आशिष शेलार, लोढा यांच्या सगळ्यांसोबत उभे राहिले तर गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देतील, असं देखील नितेश राणे म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -