घरमनोरंजननागार्जुनच्या बर्थडेला सून समांथा गायब, नागा चैतन्यापासून लवकरच घेणार घटस्फोट?

नागार्जुनच्या बर्थडेला सून समांथा गायब, नागा चैतन्यापासून लवकरच घेणार घटस्फोट?

Subscribe

समांथाचे लग्न मोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहे.

दाक्षिणात्य (south superstar)सुपरस्टार नागार्जुन ( Nagarjuna )अक्किनेनी आपल्या खास अंदाजाने आणि स्टाईलने फक्त साऊथ सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 29 ऑगस्ट रोजी नागार्जुनने त्याचा 62 वा वाढदिवस साजरा केला. ( Inside Photos Of Nagarjuna Akkinenis Birthday Bash)या खास दिवशी त्याच्या कुंटुबातील जवळील व्यक्ती सोबत हा स्पेशल दिवस त्याने घालवला. दरम्यान, नागार्जुनच्या मुलाने म्हणजेच नागा चैतन्याने (naga chaityanya)त्याच्या सोशल मीडिया अकांऊवर वडिलांसोबत एक फोट शेअर केला. यावेळी या फॅमिली फोटो मध्ये नागा चैत्यन्यची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री समांथा अक्किनेनी तेथे उपस्थित नसल्याचे दिसतेय.(samantha naga chaitanya divorce) तिच्या अनुपस्थितीमुळे नागा आणि तिच्यात काही तरी बिनसले आहे अश्या चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगत आहे.(Samantha Akkineni taking divorce from naga chaitanya)

इतकंच नाही तर, नागार्जुनची पत्नी आमलाने देखील या खास दिवसाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले, यामध्ये नागार्जुन, नागा चैतन्य, अखिल आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण वाढदिवसी उपस्थित असल्याचे दिसतेय तसेच आमलाने याला सुंदर कॅप्शन देत लिहलं आहे की, ‘माय लव्ह, तुला चांगले आरोग्य, आनंद, समाधान मिळो.. देवाच्या आशिर्वादाने आज मी तुझ्यासोबत आहे. वाढदिवशी विशेष शुभेच्छा. तसेच सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद’. मात्र कोणत्याही फोटोमध्ये समांथा दिसत नसल्याने सर्व चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

फोटो पाहा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Harsh Dixit (@chefharsh)

- Advertisement -

समांथा व्यावसायिक आयुष्याबरोबरच, वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चेत आसते. काही दिवसांपासून तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील चर्चांना उधाण आलं आहे. समांथाचे लग्न मोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहे. अनेक अहवालांमध्ये म्हटले जात आहे की, सामंथा अक्किनेनी आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी असी बातमी समोर आली होती की, दोघं एकत्र राहत नाहीत. मात्र, यासंदर्भात माध्यमांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

- Advertisement -

 


हे हि वाचा – ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’ अभिनेत्री सुरभि ज्योती देणार बहुचर्चीत प्रश्नाचे उत्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -