घरमहाराष्ट्रमुंबई उपनगरांत रिलायन्सऐवजी 'अदानीं'ची वीज!

मुंबई उपनगरांत रिलायन्सऐवजी ‘अदानीं’ची वीज!

Subscribe

मुंबईतील ३० लाखांहून अधिक वीज ग्राहकांना आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ऐवजी अदानी ट्रान्समिशनमार्फत वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबई उपनगरात ३० लाखांहून अधिक वीज ग्राहकांना आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ऐवजी अदानी ट्रान्समिशनमार्फत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा १०० टक्के समभाग हा अदाणी ट्रान्समिशन लिमिटेडला विक्रीसाठी गुरुवारी परवानगी दिली. जुलै महिनाअखेरीस हा व्यवहार पूर्ण होणार आहे. १४ जून रोजी या प्रकरणावर राज्य वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी झाली होती.

अंबानींऐवजी ‘अदानीं’ची वीज

रिलायन्स इन्फ्राला याआधीच स्पर्धा आयोगामार्फत तसेच कंपनीच्या शेअर होल्डर्समार्फत परवानगी देण्यात आली आहे. रिलायन्स आणि अदानी यांच्याअंतर्गत १०० टक्के समभाग विक्रीसाठीचा करार याआधीच झाला होता. करारांतर्गत वीज निर्मिती, वितरण आणि पारेषण या कंपनीचे समभाग विक्री करण्याचा हा करार होता. या कराराची अंदाजित रक्कम १८ हजार ८०० कोटी रूपये इतकी होती. रिलायन्स इन्फ्रामार्फत कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी या करारातील रकमेचा वापर करण्यात येणार आहे. या करारामुळे कंपनी ३०० कोटी रूपये इतकी फायद्यात येईल, असा अंदाज आहे.

- Advertisement -

रिलायन्स एनर्जीमार्फत ३० लाख ग्राहकांना मुंबई उपनगरात वीज पुरवण्यात येते. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. रिलायन्स एनर्जीचे मुंबईत ४०० चौरस मीटरचे वीज वितरण जाळे आहे. तर मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना १८०० मेगावॉट विजेची गरज रिलायन्स एनर्जीमार्फत भागवण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -