घरमहाराष्ट्रआता ‘महास्टुडंट’ अ‍ॅपद्वारे विद्यार्थी, शिक्षकांची हजेरी डिजिटल

आता ‘महास्टुडंट’ अ‍ॅपद्वारे विद्यार्थी, शिक्षकांची हजेरी डिजिटल

Subscribe

राज्यामध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती सरल प्रणालीवर भरण्यात येते. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्यात येते. मात्र भारत सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) शिक्षक व विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने हजेरी भरावी लागते. यासाठी गुणही देण्यात येतात. त्यामुळे ही हजेरी डिजिटलमध्ये सोप्या पद्धतीने नोंदवता यावी, यासाठी राज्य सरकारने ‘MahaStudent’ हे नवे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी व गैरहजेरी एका क्लिकद्वारे शिक्षकांना कळणे शक्य होणार आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येत आहे. भारत सरकारने पीजीआय हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नोंदणी करावी लागू नये यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या सरल प्रणालीवर आधारित सुविधा उपलब्ध करून सर्व विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थित डिजिटल पद्धतीने ‘MahaStudent’ अ‍ॅप विकसित केले आहे.

- Advertisement -

या अ‍ॅपद्वारे विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी भरून घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर ‘MahaStudent’ नावाने उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच्याआधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची गैरहजेरी काही क्लिक सरशी नोंदवता येणार आहे. याचसोबत शाळेमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. या अ‍ॅपमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळे ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी आवश्यक असणारे दोन्ही अ‍ॅपचे एकत्रीकरण करण्यात आले असून, राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिकवर विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -