घरक्रीडाChess : कोरोना नंतर पहिली ऑफलाइन आणि ऑनलाइन बुद्धिबळ प्रीमियर लीग

Chess : कोरोना नंतर पहिली ऑफलाइन आणि ऑनलाइन बुद्धिबळ प्रीमियर लीग

Subscribe

भारतीय बुध्दीबळ महासंघाने ऑनलाइन बुध्दीबळाची ताकद आणि त्यापासून भारतीय खेळाडूंवर कशा प्रकारे फायदा होत आहे हे लक्षात घेतले आहे

बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंना चांगले यश मिळाले आहे यात ऑनलाइन बुद्धिबळाचा मोठा वाटा आहे. अशातच भारतीय बुध्दीबळ महासंघाने ऑनलाइन बुध्दीबळाची ताकद आणि त्यापासून भारतीय खेळाडूंवर कशा प्रकारे फायदा होत आहे हे लक्षात घेतले आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर पहिल्यांदाच आयपीएलच्या धर्तीवर ऑफलाइनसोबतच ऑनलाइन बुद्धिबळ लीग देशात प्रथमच करोडो रुपये खर्चून आणत आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीने सगळेच व्यवहार ठप्प केले होते. त्यात मैदानी तसेच सर्व खेळांचा समावेश होता. पण बुध्दीबळ हा एकच खेळ होता ज्याच्यावर कोरोनामुळे काही परिणाम झाला नाही. कोरोना काळात देखील बुध्दीबळाचे ऑनलाइन पध्दतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सामने चालू होते.

बुध्दीबळ स्पर्धेत भारतीयांचे मोठे यश

बुध्दीबळ ओलंपियाडमध्ये भारतीय खेळाडूंच्या सुवर्ण कामगिरीमागे ऑनलाइन बुध्दीबळाचा मोठा हात आहे. त्यामुळे बुध्दीबळ महासंघाचे अध्यक्ष संजय कपूर यांनी ऑनलाइन बुध्दीबळाची ताकद लक्षात घेऊन आयपीएलच्या धर्तीवर ऑफलाइन सोबतच ऑनलाइन बुध्दीबळ लीग भरवणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

जगभरातील खेळाडूंनी सजलेली पहिली ऑनलाइन ऑफलाइन लीग लवकरच

जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंनी सजलेली ऑनलाइन आणि ऑफलाइन बुध्दीबळ लीग लवकरच सुरू होणार आहे. संजय कपूर यांनी सांगितले की, ऑफलाइन लीगची तयारी महासंघातर्फे पहिलीच करण्यात आली आहे. बुध्दीबळ ओलंपियाडमध्ये संघाचे यश पाहता आम्हाला जाणवले की ऑनलाइन बुध्दीबळ लीग ठेवणे गरजेचे आहे. ओलंपियाड स्पर्धेच्या दरम्यान विश्वनाथन आनंद यांच्या नेतृत्वात भारतीय संघाला चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली. त्याच्यावर २० लाख रूपयांचा खर्च आला, हा अनुभव खूप चांगला होता. तेव्हाच ठरवले की ऑनलाइन लीगचे आयोजन केले पाहिजे. असे डॉ.संजय कपूर यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा: Hockey : माजी हॉकी प्रशिक्षक शोर्ड मरिनवर डेटा चोरीचा आरोप


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -