घरमहाराष्ट्रनागरीक बेहाल! आधीच आर्थिक संकट त्यात टोल दरवाढ

नागरीक बेहाल! आधीच आर्थिक संकट त्यात टोल दरवाढ

Subscribe

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलच्या दरांमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ ५ रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंतची असणार आहे. तसेच मासिक पासच्या दरात देखील वाढ करण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होईल. एकीकडे लोकल बंद असताना, टोल दरवाढीमुळे मुंबईत ये-जा करणाऱ्य लाखो वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसणार आहे.

२५ वर्षांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल वसूली

दहिसर, ऐरोली, वाशी, आनंद नगर (मुलुंड) आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग (मुलुंड) या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोल नाके आहेत. मुंबईत बांधलेल्या ५५ उड्डाणपुलाच्या उभारणीचा खर्च वसूल करण्यासाठी हे टोलनाके उभारण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या एमईपी कंपनीच्या करारानुसार २००२ ते २०२७ अशा २५ वर्षांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल वसूल करण्यात येणार आहे. तसेच दर ३ वर्षांनी या टोलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची तरतूद या करारात आहे. त्यामुळेच २०२७ नंतर आता २०२० मध्ये टोल दर वाढ केली जात आहे.

- Advertisement -

असे असतील नवे दर 

एक ऑक्टोबरपासून या टोलचे नवीन दर लागू होतील. त्यानुसार कार, जीपसारख्या चारचाकी हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने, त्यांना ३५ रुपयांच्या ऐवजी चाळीस रुपये टोल द्यावा लागेल. मिनी बससारख्या मध्यम वाहनांच्या टोल दरात १० रुपयांनी वाढ होऊन तो ५५ रुपयांवरून ६५ रुपये करण्यात आला आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात १०५ वरून १३० अशी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल १३५ रुपयांवरून १६० रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे. केवळ एका टोलसाठी असलेला मासिक पास आता १२४० रुपये करण्यात आला असून पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रुपयांऐवजी १५०० रुपये होणार आहे.

हेही वाचा –

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट?; ऐका काय म्हणाले महापालिका आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -