घरCORONA UPDATEOmicron variant : दिलासाजनक! राज्यातील ओमायक्रॉनचे सात रुग्ण बरे

Omicron variant : दिलासाजनक! राज्यातील ओमायक्रॉनचे सात रुग्ण बरे

Subscribe

राज्यामध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली. मात्र यातील ७ रुग्णांची आरटीसीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. ही बाब राज्यासाठी दिलासादायक ठरली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये ५, पिंपरी चिंचवड १०, पुणे महापालिका १ आणि कल्याण डोंबिवलीमध्ये १ रुग्णाचा समावेश आहे.

ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मात्र राज्यात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या १७ पैकी ७ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ही बाब राज्यासाठी दिलासादायक ठरली आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंतच्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा नव्या ओमिक्रॉन व्हेरीएंटची बाधा झालेल्यांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसतात. मात्र वेळेत उपचार मिळाल्याने अनेक रुग्ण बरे होत आहेत. ओमिक्रॉनचा वाढता कहर पाहता लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.


अमेरिकेच्या केंटकी राज्यात चक्रीवादळाचा कहर, ५० लोकांचा मृत्यू, वादळाने घरांची छते उडाली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -