घरपालघरआपल्या कामातून इतिहास घडतो

आपल्या कामातून इतिहास घडतो

Subscribe

तर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक भरत गारे यांनी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे काम वाखण्याजोगे असून आदिवासीमधील असे हिरे शोधून त्यांचा सन्मान करणे खरेच मोठ काम असल्याचे त्यांनी सांगितले.

मोखाडा: आपले काम प्रामणिकपणे करत रहा आपल्यास कर्तव्याशी एकनिष्ठ रहा, मग बघा आपल्या कामाची नोंद इतिहासात होते. कारण आपल्या भागातील क.ै गंगुबाई ठोंबरे या पहिल्या आदिवासी महीला शिक्षिका असल्याचे आता समोर आले आहे. आजवर याबाबत कोणालाही माहिती नव्हती. मात्र त्यांच्या नातीने ही सगळी माहिती शोधून काढली. यामुळे आज त्यांचा इतिहास आपण आठवत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती प्रदीप वाघ यांनी यावेळी केले. यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीकडून गंगुबाई यांच्या नावाने आदर्श शिक्षिका म्हणून सुर्यमाळ येथील शिक्षिका हेमलता पाटिल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पहिल्या आदिवासी महिला शिक्षिका कै गंगुबाई ठोंबरे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० , च्या दरम्यान या भागात काम केले. आजही या भागातील शिक्षणाच्या सुख सोयी, रस्ते इमारती या सर्वांची आबाळ असताना त्याकाळात गंगूबाई यांनी केलेले हे काम नक्कीच दखलपात्र असून यांच्या नावाने आता दरवर्षी सरकार दरबारी नोंद होईल, असा पुरस्कार देण्यात येणार असल्याचा मानस वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नावळे यांनी या भागातील सुख, सोयी वाढवण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणावर काम करणे अपेक्षित आहे. तर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक भरत गारे यांनी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे काम वाखण्याजोगे असून आदिवासीमधील असे हिरे शोधून त्यांचा सन्मान करणे खरेच मोठ काम असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या कार्यक्रमास उपस्थित सहाय्यक गटविकास अधिकारी तुषार सूर्यवंशी यांनी त्या काळात एक आदिवासी महिला कोणत्या स्थितीत शिक्षणाचे काम करीत असेल याचा विचार आज करायला हवा. यामुळे नक्कीच असे कार्यक्रम व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले. तर पत्रकार हनिफ शेख यांनी शिक्षकी पेशाचे महत्त्व विषद करताना आपल्या पेशाशी सर्वांनी प्रमाणिक राहायला हवे, त्याचप्रमाणे असे उपक्रम हाती घ्यायला एक वेगळे मन असावे लागते. ते मन या समितीच्या सर्व मंडळीकडे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, कै.गंगुबाई ठोमरे यांची मुलगी प्रमिला जोशी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी भुसारा,अनिता पाटील, संतोष पाटील, आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मंगेश दाते, रमेश बोटे, संजय वाघ विष्णू हमरे, विठ्ठल गोडे, संजय हमरे, सुर्यमाळ सरपंच गीता पाटील,वाशाळा सरपंच कृष्णा वाघ,किनिस्ते सरपंच योगेश दाते, नंद कुमार वाघ, प्रकाश मडके, ठोमरे परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -