घरमहाराष्ट्रUddhav Thackeray यांच्या मिश्किल टिप्पणीवर छगन भुजबळ म्हणाले; "आपल्याकडे आले तर..."

Uddhav Thackeray यांच्या मिश्किल टिप्पणीवर छगन भुजबळ म्हणाले; “आपल्याकडे आले तर…”

Subscribe

"भरत गोगावलेंनी विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर हे वक्तव्य केले आहे. यामुळे गोगावलेंच्या वक्तव्यावर मी बाहेर बोलणे बरोबर नाही", अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

नागपूर : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी पेढे खाण्यासाठी आणि अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कमी तिखट जेवण खायाला जाणार आहे, असा मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केला आहे. उद्धव ठाकरे आपल्याकडे आले तर पेढेच नाही, जेवायला देऊ, अशी प्रतिक्रिया राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळांच्या घरी पेढा आणि प्रफुल्ल पटेलांच्या कमी मिर्चीचे जेवण खाण्यासाठी जाऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देत “यासाठी उद्धव ठाकरेंना ईडीसारख्या केसची वाट बघण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे कधीही माझ्याकडे निरोप पाठवून येऊ शकतात, यात काहीच अडचन नाही, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – “Praful Patel अन् Chhagan Bhujbal यांना राज मान्यता”, उद्धव ठाकरेंचा टोला

छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते. तसे आम्ही देखील सुरतला गेलो होतो, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांनी केले होते, या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “भरत गोगावलेंनी विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर हे वक्तव्य केले आहे. यामुळे गोगावलेंच्या वक्तव्यावर मी बाहेर बोलणे बरोबर नाही”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Praful Patel यांना वाचवण्यासाठी सारवासारव सुरू – संजय राऊत

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मागे घेतली होती, यावरून उद्धव ठाकरे म्हणाले, “छगन भुजबळांकडे कोणती जडीबुडी मिळाली. कोणता असा चमत्कार झाला आणि त्यांना कोणता साधू बाबा भेटला की, ईडी एकदम मागेच गेली. गेल्या वेळेस ईडी म्हणाली की, आम्ही कशासाठी केस केली हेच माहिती नाही. ही जडीबुडी देवा सगळ्यांना दे, अशी माझी प्रार्थना आहे.” उद्धव ठाकरे म्हणाले जवळपासून दोन अडीच वर्षापूर्वी ते तुरुंगात होते. त्यावेळी भुजबळांवर गंभीर आरोप होते. आता अचानक कोणता चमत्कार झाला की, ईडीने त्यांच्यावरी केस परत घेतले आणि त्यांना फ्री केले. भुजबळांप्रमाणे सगळ्यांच बरी करा.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -