घरAssembly Session LiveWinter Session : लोकसभेत दोन तरुणांची घुसखोरी; उपसभापतींनी विधान परिषदेतील गॅलरी पास...

Winter Session : लोकसभेत दोन तरुणांची घुसखोरी; उपसभापतींनी विधान परिषदेतील गॅलरी पास केले बंद

Subscribe

नागपूर : आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेवर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता आणि आजच्या दिवशी लोकसभेच्या प्रक्षेक गॅलरीत बसलेल्यापैकी दोन तरुणांनी खासदार बसलेल्या सभागृहीत उडी मारली. त्यामुळे तिथे उपस्थित खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचपार्श्वभूमीवर विधिमंडळात असे काही होऊ नये म्हणून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवीन लोकांसाठी गॅलरी पास बंद केले आहेत. (Winter Session Two youths infiltrate Lok Sabha The Deputy Speaker passed the gallery in the Legislative Council closed)

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आपण नवीन गॅलरी पासेस बंद करत आहोत. कारण दिल्लीत लोकसभा अधिवेशनात गॅलरीतून दोन नागरिकांनी उडी मारल्यामुळे त्याठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण नवीन लोकांसाठी गॅलरी पासेस बंद करत आहोत. त्यामुळे कोणत्याही आमदारांनी गॅलरी पासेसचा आग्रह करू नये. तसेच लोकसभेतील घटनेनंतर विधानसभेतही प्रत्येक आमदाराला जास्तीत दोन पासेस देण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: मराठा समाजाच्या विरोधातील पत्रात ‘या’ तीन आमदारांची नावे; मात्र आरक्षणाला पाठिंबा

दरम्यान, लोकसभेत बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरीत बसलेल्यापैकी दोघांनी थेट खासदार बसलेल्या ठिकाणी उडी मारली आणि स्मोक कँडल जाळल्या. उडी मारणाऱ्यांपैकी एकाने खासदारांच्या डेस्क वरून लोकसभा अध्यक्षांच्या आसानाकडे जाण्याच्या प्रयत्न केला. या दोघांनाही खासदारांनी पकडले आणि सुरक्ष रक्षकांच्या हवाली करण्यात आले. या गोंधळामुळे संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक संसदेत आले होते. त्यांनी प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी घेतली आणि स्मोक कँडल फेकली. यामुळे लोकसभेत धूर झाला आणि गोंधळ उडाला. यातील एक तरुण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव अमोल शिंदे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघांचा ससंदेत घुसण्याचा उद्देश अजून समोर आलेला नाही.

हेही वाचा – MLA Disqualification : भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांचे खडेबोल; “छत्रपती शिवाजी महाराजांचा…”

एका तरुणाचे महाराष्ट्र कनेक्शन

लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्यांमध्ये मराठी तरुणाचा समावेश असून त्याचे नाव अमोल शिंदे असे आहे. अमोल हा लातुर जिल्ह्यातील आहे. अमोल सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव सागर असल्याचे समजते. या तरुणांसोबत 40 वर्षीय नीलम सिंग नावाची महिला देखील होती. स्मोक स्कँडल जाळल्यानंतर या तरुणांनी ताणाशाही नही चलेगी, असा घोषणा सभागृहात दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -