घरमहाराष्ट्रपुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे चिमुरड्याचा मृत्यू

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे चिमुरड्याचा मृत्यू

Subscribe

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे एका ९ वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुण्यातील एका घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड येथील आनंदनगर येथे राहणारे डोंगरे या कुंटुंबियाने घरामध्ये पेस्ट कंट्रोल केले होते. पेस्ट कंट्रोल करुन झाल्यानंतर हे कुटुंब झोपण्यासाठी घरी आले. घरी आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना पेस्ट कंट्रोलचा त्रास होण्यास सुरुवात झाली. कुटुंबातिल सदस्यांना अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. या कुटुंबातील सार्थक डोंगरे (९) या चिमुरड्याला जास्त त्रास होत असल्याने सार्थकला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या चिमुरड्याचा उपचारानंतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -