घरमहाराष्ट्र१ लाख भावी शिक्षकांची परीक्षा

१ लाख भावी शिक्षकांची परीक्षा

Subscribe

मुंबईसह राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत होणार्‍या गैरप्रकाराला अखेर चाप बसणार आहे, शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेस पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीकोनातून ‘पवित्र’ हे नवे वेबपोर्टल शुक्रवारपासून सुरु केले आहे

कॉलेजातील प्रवेशासाठी तासानतास कॉम्प्युटरसमोर बसून पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांची होणारी दमछाक आता येत्या काळात शिक्षकांनादेखील अनुभवावी लागणार आहे. राज्यभरातील विविध शाळांत शिक्षक म्हणून निवडीसाठी त्यांना रांगेत उभे रहावे लागणार आहे. या भावी शिक्षकांना त्यांना काम करावयाच्या २० शाळांचा पंसतीक्रम भरावा लागणार आहे. अशा प्रकारे भावी शिक्षकांची परीक्षा लवकरच सुरु होणार आहे.

शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पवित्र’ पोर्टल

या नव्या पोटर्लमुळे खासगी शिक्षण संस्थाच्या मनमानीला चाप बसणार आहे. या निर्णयाच्या माध्यामातून स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदातिन व विनाअनुदानित पदांवरील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.

- Advertisement -

कशी होणार शिक्षकांची परीक्षा

पहिला टप्पा – पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.
दुसरा टप्पा – संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये online तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करणे.
तिसरा टप्पा – संस्थांच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी २० पसंतीक्रम निवडणे.
चौथा टप्पा – गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध करून देणे.

कोण करु शकतात अर्ज

अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) मध्ये ० पेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विद्यार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र विद्यार्थी हे इ. १ ते ५ तसेच इ. ६ ते ८ मधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात. इ. ९ वी ते १२ वी साठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) मध्ये ० पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या संकेतस्थळावर नोंदणी (registration) करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा User Id असेल. नोंदणी करण्यासाची कार्यपध्दती User manual मध्ये दिलेली आहे.

- Advertisement -

संस्थांच्या मनमनीला चाप बसणार

यापूर्वी खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती. परंतू, आता पवित्र या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती पवित्र या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक असणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -