घरताज्या घडामोडीराजपूत आत्महत्या प्रकरण किणी प्रकरणाचा फ्लॅशबॅकच - संजय राऊत

राजपूत आत्महत्या प्रकरण किणी प्रकरणाचा फ्लॅशबॅकच – संजय राऊत

Subscribe

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर राजकीय सूडासाठी केला जात असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या या प्रकरणाचा वापर विरोधी पक्ष एखाद्या सूडनाट्यासारखे करत आहे. त्यात त्यांना यश येणार नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरण किणी प्रकरणासारखंच विरोधकांनी वापरायला सुरुवात केली आहे”, अशी जोरदार टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजनाचा सोहळा होत असताना राज्यात मात्र सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन गदारोळ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्याला निमंत्रित न करण्याच्या न्यासाच्या निर्णयावर शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आपलं महानगरला दिलेल्या मुलाखतीत जोरदार हल्ला चढवला.

ते म्हणाले, अयोध्येतला राम हा जसा भाजपचा आहे तसा तो सेनेचा, काँग्रेसचाही आहे. मंदिराचा न्यास भाजपचा आहे. तुम्ही शिवसेनेला तिथे येण्यापासून थांबवताय. पण आमच्या मनातला राम कसा थोपवणार? तुम्ही भूमीपूजनाचा कार्यक्रम करून घ्या. उध्दव ठाकरे लवकरच अयोध्येला येतीलच. या राम मंदिर उभारणीच्या कामातील स्व. राजीव गांधी, नरसिंह राव, आणि शंकर दयाळ शर्मा यांचे योगदान दुर्लक्षिता येणार नाही, अशी तूफान फटकेबाजी संजय राऊत यांनी ‘माय महानगर’च्या बहुचर्चित खुल्लमखुल्ला या कार्यक्रमात केली.

- Advertisement -

#Live: संजय राऊत – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या | किणी प्रकरणाचा फ्लॅशबॅक

#Live: संजय राऊत – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या | किणी प्रकरणाचा फ्लॅशबॅक

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, August 4, 2020

 

- Advertisement -

उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अननुभवावर विरोधक टीका करतात, तुम्ही या टिकेकडे कसं पाहताय? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना कुठे पंतप्रधानपदाचा अनुभव होता. अमित शहा तर गुजरातमध्ये राज्यमंत्री होते. त्यांना तर कॅबिनेट मंत्री पदाचाही अनुभव नव्हता. पण ते आता देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडतायत. त्यामुळे गुणवत्तेचा आणि अनुभवाचा काही संबंध नसतो. संधी मिळाली की काम करता येतेच.

उध्दव ठाकरेंकडून हिंदुत्वाची गल्लत होत नाही. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आमचा हिंदुत्वाचा ध्यास कुणीही हिरावू शकत नाही.अगदी भाजप आणि मोदीही. पण आता आता राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला की इतर प्रश्नांकडेही पहावं लागणार आहे. देशासमोर रोजी-रोटी आणि जगण्याचा प्रश्न सोडवायचे आव्हानही आहे.

राम मंदिराचा भूमीपूजन हा मोदींच्या हॅट्ट्रिक साठीचाही कार्यक्रम असेल तर ते गंभीर आहे. याआधी दोन निवडणुकीत मंदिराच्या मुद्यावर विजय मिळवला. आता देश किती वेळ एकाच मुद्यावर मतदान करणार; पण त्यासाठी विरोधी पक्षाला सक्षम होऊन उभे रहावे लागेल, लढावे लागेल, असे संजय राऊत एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या हा विषय विरोधकांनी किणी प्रकरणासारखा तापवलाय. विरोधक थेट नाव घेऊन का बोलत नाहीत. हा ९० च्या दशकातल्या किणी प्रकरणाचा फ्लॅशबॅक आहे. तेव्हाही विरोधकच होते, आताही तेच आहेत. पण आदित्य ठाकरे यांना काहीही होणार नाही की उद्धवजींच्या मुख्यमंत्रीपदाला धक्का पोहचणार नाही. सरकार एकदम सुरक्षित आहे, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.

याच मुलाखतीत बोलताना राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांची ठाकरे फॅमिली, पवार-ठाकरे नातेसंबंध, सामनाचे पत्रकारितेमधील स्थान, मिलिंद नार्वेकर- राऊत जोडगोळी, ठाकरेंच्या तीन पिढ्या यावरही राऊत भरभरुन बोलले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -