घरमहाराष्ट्रनागपूरविकसित महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न; महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीसांचं विधान

विकसित महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न; महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीसांचं विधान

Subscribe

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करत महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प असल्याचं ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मित होऊन आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करत महाराष्ट्राला विकसित करण्याचा संकल्प असल्याचं ते यावेळी म्हणाले.(  Our effort to build a developed Maharashtra Statement of Devendra Fadnavis on Maharashtra Day )

महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी राजकीय नेत्यांनी संबोधलं होतं की आज देशामध्ये 14 वं रत्न जन्माला आलं. त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रचंड प्रगती ही संपूर्ण देशामध्ये सर्वांचे डोळे दिपून जातील अशा प्रकारचे राहिली आहे. देशाच्या जीडीपीत 15 टक्के योगदान महाराष्ट्राचं आहे. देशाच्या एकूण इंडस्ट्रीस आऊटपूटमध्ये 20 टक्के आऊटपूट महाराष्ट्र देत आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 15 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होत आहे. देशामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘वज्रमूठ’ सभेपूर्वीच ठाकरे गटाला धक्का; पक्षाची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदे गटात )

वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने अतिशय चांगली प्रगती केली आहे. माता मृत्यू दर, अन्य सामाजिक मानकं यामध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे. अत्यंत पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने बघितलं गेलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार आलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आपण प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम आपण केलं आहे. या अर्थसंकल्पात अनके योजना घोषित केल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करण्याकरता मोदींनी किसान सन्मान योजना सुरु केली आणि सहा हजार थेट शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मोदींनी किसान सन्मान योजना सुरु केली आणि सहा हजार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतला. त्याला जोड म्हणून नव किसान सन्मान योजना आपण सुरु केली आणि सहा हजार दिले. म्हणजेच शेतकऱ्याच्या खात्यात आता 12 हजार येत आहेत, असं सांगत आतापर्यंत सुरु केलेल्या सर्व योजनांचा थोडक्यात आढावा फडणवीस यांनी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -