घरमहाराष्ट्र'वज्रमूठ' सभेपूर्वीच ठाकरे गटाला धक्का; पक्षाची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदे गटात

‘वज्रमूठ’ सभेपूर्वीच ठाकरे गटाला धक्का; पक्षाची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदे गटात

Subscribe

वज्रमूठ सभेआधी ठाकरे गटाची इत्यंभूत माहिती असणारे शिंदेंच्या गळाला लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय आणि उद्धव ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची खडा न खडा माहिती असलेले माहितगार मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. वज्रमूठ सभेआधी ठाकरे गटाची इत्यंभूत माहिती असणारे शिंदेंच्या गळाला लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय आणि उद्धव ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची खडा न खडा माहिती असलेले माहितगार मारुती साळुंखे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केले. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.  ( Maruti Salunkhe has officially entered the Shiv Sena shinde group Chief Minister Eknath Shinde Varsha residence )

….म्हणून शिवसेनेत ( शिंदे गट) केला प्रवेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उठाव करुन एकनाथ शिंदे यांनी नवी चूल मांडल्यानंतरही नव्याने बांधणी करण्यासाठी मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी सलगी करुन घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसंच, बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाळी शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर शिवसेनेत ( शिंदे गटात) जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मारुती साळुंखे यांनी दिली आहे.

- Advertisement -

संघटना वाढवणार

साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्याने बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच, सोबत मिळूवन संघटना अधिक जोमाने वाढवू असंही सांगितलं.

( हेही वाचा: प्रियांका गरजल्या – मोदींनी माझ्या भावाकडून शिकावं, राहुल म्हणतात ‘मी देशासाठी शिव्याच नाही तर गोळ्याही झेलायला तयार’ )

- Advertisement -

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची अचूक बांधणी करणारा एक मोहरा शिंदे यांना मिळाल्याने पक्षवाढीसाठी त्याचा त्यांना मोठा उपयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -