घरदेश-विदेशLPG Cylinder : व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, मात्र...

LPG Cylinder : व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, मात्र…

Subscribe

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्यामुळे आज कामगार दिनानिमित्त सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे, मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही. (Oil marketing companies have revised the prices of commercial LPG gas cylinders)

आज १ मे २०२३ रोजी म्हणजेच कामगार दिनानिमित्त सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 171.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत. या नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत मुंबईत (MUmbai) 1808.50 रुपये, दिल्लीत (Delhi) 1856.50 रुपये, कोलकातामध्ये (Kolkata) 1960.50 रुपये आणि चेन्नईमध्ये (Chennai) 2021.50 रुपये अशी असणार आहे.

- Advertisement -

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसच्या किमतीत बदल करत असतात. त्यानुसार १ एप्रिल २०२३ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यावेळी गॅस सिलेंडर 92 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती. यापूर्वी 1 मे 2022 रोजी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2355.50 रुपयांना उपलब्ध होता. आज त्याची किंमत 1856.50 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 499 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

- Advertisement -

19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये फरक काय?
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -