घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई-नाशिक महामार्गावर पजेरो-ट्रक भीषण अपघात; दोन ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर पजेरो-ट्रक भीषण अपघात; दोन ठार

Subscribe

विक्रोळीच्या मेडिकल व्यावसायिकांवर काळाचा घाला

अस्वली स्टेशन : मुंबईआग्रा महामार्गावरील आठव्या मैलाजवळ गुरुवारी (दि. २८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवाहतूक हायवा गाडी आणि पेजेरो यांच्यातील भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अभिशेख दत्ता बरदाडे (वय 26) आणि प्रकाश साहू (वय 52) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे असून पराग वाळके (वय 27) हे गंभीर आहेत. त्यांचेवर नाशिच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत नाशिक तालुका व वाडीवहे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई कडुन नाशिक मार्गे जळगााव कड़े पजेरो कार क्रं MH.04.HF.1917 ने वरील तिघे जण आपल्या खाजगी मेडीकल च्या कामासाठी जात होते. आठवा मैल येथे रस्ता क्रॉसिंग करताना हायवा गाड़ी क्रं MH.15 GU.9222 ने पजेरो ला जोरदार धडक दिली असता पजोरा गाडीतील तिघे जन गंभीर गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे या अपघातात पजेरो चा अक्षरशः चक्काचुर झाला. या अपघताची खबर वाडीवहे पोलिसांना समजताच ते नरेंद्र महाराज सस्थानच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तत्काळ दोघांना वक्रतुंड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्यानंतर तब्बल दिड तासाने क्रेन च्या सहाय्याने पेजोरो तुन चालकाला बाहेर काढण्यात येवून निवृत्ती गुंड यांनी त्यांना वक्रतुंड ला पोहचवले.

- Advertisement -

यापैकी अभिषेक बरदाडे आणि प्रकाश साहू हे गंभीर जखमी होते. त्यांचेवर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे. तर पराग वाळके यांचीही प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. हे तिघेही आपल्या मेडिकल व्यवसायाच्या कामासाठी जात होते. हा अपघात नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दित झाल्यामुळे पुढील तपास नाशिक तालुका पोलिस करत आहे. अपघातानंतर सुमारे 2 तास वाहतूक खोलम्बली. ती सुरळीत करण्यासाठी वाडीवहे पोलिस कर्मचारी शाम सोनवणे, नींबाळकर तसेच नाशिक तालुका पोलिस ठान्याचे देशमुख आणि वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -