घरमहाराष्ट्रPankaja Munde : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला ईपीएफओ नोटीस; वाचा सविस्तर

Pankaja Munde : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला ईपीएफओ नोटीस; वाचा सविस्तर

Subscribe

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने सुरू केला होता.

बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला पैसे थकवल्याप्रकरणी पुन्हा एक नोटीस बजावण्यात आली आहे. वैद्यनाथ सारख कारखान्याने कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा 61 लाख 47 हजार रुपये थकीत पीएफ न भरल्याने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने बजावली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याची 61 लाख 47 हजार रुपयाचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम न भरल्यामुळे ईपीएफओ कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. सध्या कारखाना बंद अवस्थेत असून यात काहीच लोक काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम जमा न केल्यामुळे कारखान्याला नोटीस आली आहे. ही नेहमीची प्रक्रिया असून कर्माचाऱ्यांच्या पीएफची रक्कम टप्प्या टप्प्याने भरणार आहोत, अशी प्रतिक्रिया कारखान्याने दिली आहे. यापूर्वी जीएसटी विभागाने देखील कारखान्याला 19 कोटी थकीत असल्याचे नोटीस बजावले होती.

- Advertisement -

हेही वाचा – Sansad Ratna Award 2024 : सुप्रिया सुळे आठव्यांदा संसदरत्न, महाराष्ट्रातून पाच खासदारांचा होणार सन्मान

पाण्याअभावी कारखाना बंद

साखर कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने सुरू केला होता. पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकड मुंडे यांच्याकडे कारखान्याचे अध्यक्ष झाल्या. पण काही वर्षात कारखान्याने बँकांकडून कर्ज घेतले आहे. सध्या हा कारखाना पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे बंद आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवारांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय”, शरद पवारांचा आरोप

युनियन बँक ऑफ इंडियाला कर्ज

यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या 203 कोटी 69 लाख रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. याप्रकरणी बँकेने नोटीस बजावली असून कारखान्याच्या लिलावाची जाहिरातही दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -