घरदेश-विदेशSansad Ratna Award 2024 : सुप्रिया सुळे आठव्यांदा संसदरत्न, महाराष्ट्रातून पाच खासदारांचा...

Sansad Ratna Award 2024 : सुप्रिया सुळे आठव्यांदा संसदरत्न, महाराष्ट्रातून पाच खासदारांचा होणार सन्मान

Subscribe

नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारे संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आज (ता. 17 फेब्रुवारी) संसदरत्न पुरस्कारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आठव्यांदा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्याशिवाय डॉ. अमोल कोल्हे, डॉ. श्रीकांत शिंदे, हिना गावित आणि श्रीरंग बारणे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज हे पुरस्कार देण्यात आले. नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. (Supriya Sule becomes Sansad Ratna for the eighth time, five MPs from Maharashtra will be honored)

हेही वाचा… Supriya Sule : “संसदेचा जो उल्लेख झाला ते दुर्दैवी”, अजित पवारांच्या टीकेला सुळेंचे सडेतोड उत्तर

- Advertisement -

यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा ही 7 जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज महिन्याभरानंतर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून शरद पवार गटाचे दोन खासदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन खासदार आणि भाजपाच्या एका खासदाराला सन्मानित करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. 2010 ला या पुरस्काराचं अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले.

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आठव्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुळे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय, शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपाच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भाजपाचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -