घरमहाराष्ट्रक्षुल्लक वादातून प्रवाशाला धावत्या लोकमधून फेकले

क्षुल्लक वादातून प्रवाशाला धावत्या लोकमधून फेकले

Subscribe

क्षुल्लक वादातून धावत्या लोकलमधून फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईकरांची लाइफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गर्दीच्या वेळेत झालेल्या वादामुळे एका प्रवाशांला धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची घटना घडली आहे. विजय राम गुप्ता असे या प्रवाशाचे नाव आहे. या घटनेमध्ये गुप्ता हे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

मानखुर्द येथे राहत असलेल्या ३५ वर्षीय विजयने आज, गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. मात्र, या लोकलमध्ये गर्दी असल्याने त्यांनी मोठ्या कसरतीने आत प्रवेश केला. दरम्यान, कुर्ला स्थानक येण्यापूर्वी अनेक प्रवासी उतरण्याच्या तयारीत होते. त्यावेळेस विजय आणि अज्ञात प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि अज्ञात प्रवाशाने रागाच्या भरात विजयला धावत्या लोकलमधून धक्का दिला

- Advertisement -

दरम्यान, वादाचे नेमके कारण समोर आले नसले तरी गर्दीत धक्का लागल्यामुळे भांडण झाल्याची प्राथमिक शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – ‘या तर चोराच्या उलट्या बोंबा’; आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर घणाघात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -