घरमहाराष्ट्रपत्राचाळ घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर; ईडीने केली 'ही' कारवाई

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर; ईडीने केली ‘ही’ कारवाई

Subscribe

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाॅर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याप्रकरणी खासदार संजय राऊतांना तुरुंगवास भोगावा लागला होता. आता पुन्हा एकदा याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. पत्राचाळ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

NIA दिलेल्या माहितीनुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाॅर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही संचालकांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती म्हणजे इमराती ईडीमार्फ्त जप्त करण्यात आल्या आहेत. Patrachawl fraud case properties of Rakesh Kumar Wadhawan and Sarang Kumar Wadhawan North Goa directors of Guru Ashish Construction Company seized by Ed

- Advertisement -

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते. तीन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सध्या ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

काय आहे पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा?

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव पत्राचाळींमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली. एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट म्हाडाला देणार होती. चाळीतील 47 एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा म्हाडाला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ही जमीन इतर आठ बिल्डर्सना 1034 कोटी रुपयांना विकली. एचडीआयएल कंपनीने केलेल्या या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे, असा आरोप आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे. सध्या संजय राऊत हे या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: गुजरात पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची अडवणूक, सुरत पाकिस्तानात आहे का? नाना पटोले यांचा सवाल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -