घरमहाराष्ट्रपुणेPawar Vs Kolhe : अजितदादांनी कोल्हेंना दिलेलं 'ते' आव्हान पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात

Pawar Vs Kolhe : अजितदादांनी कोल्हेंना दिलेलं ‘ते’ आव्हान पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईसोबतच आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान अजितदादांनी पुणे दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवार देणार आणि तो निवडूनच आणणार असं खुलं आव्हान दिलं होतं.

पुणे : खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूर मतदारसंघातून उमेदवार उभा करून तो जिंकून आणणार, असे खुले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. तसेच अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, असेही ते म्हणाले होते. दादांनी दिलेलं आव्हान कोल्हेंनी स्वीकारलं असतानाच आता ते दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी पार्थ पवारांसह सुनेत्रा पवार शिरुर लोकसभा मतदारसंघात उतरल्याचं दिसून येत आहे. यामुळे खासदार कोल्हेंची डोकेदुखी वाढणार एवढं मात्र खरं. (Pawar Vs Kolhe Sunetra Pawar also in the field to complete the te challenge given by Ajitdada to Kolhe)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईसोबतच आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान अजितदादांनी पुणे दौऱ्यावर असताना खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवार देणार आणि तो निवडूनच आणणार असं खुलं आव्हान दिलं होतं. मी जे बोलतो ते करुन दाखवतो असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. तेव्हा कोल्हेंना दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार या शिरुर लोकसभा मतदार संघात जोरदार Active झाल्याचे दिसून येत आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी वाढल्या आहेत. तर सुनेत्रा पवार यांनीसुद्धा मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Loksabha: महाराष्ट्रात जे झालं तेच जम्मू काश्मीरबाबत करणार का? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या…

हळदी कुंकाच्या कार्यक्रमानाही हजेरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तशा फारशा राजकारणात दिसत नाहीत. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा अधून-मधून सुरू असते. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेंना दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्याचं बोललं जात आहे. कारण, हवेली तालुक्यातील वाघोली येथे सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके व माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यासोबतच मकर संक्रातीनिमित्त राज्यभर हळदी कुंकवाचे सुरू असून, या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजर राहत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित अनेक हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावत महिलांशी संपर्क वाढवला. अजितदादांचं कुटुंब शिरुर लोकसभा मतदार संघात सक्रीय झाल्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढल्याचे दिसून येतेय.

- Advertisement -

हेही वाचा : Team India: T-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ खेळणार मोठी मालिका; BCCIने जाहीर केलं शेड्यूल

काय म्हणाले होते अजित पवार?

2023 च्या डिसेंबर महिन्यात पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला होता. अजित पवार म्हणाले होते की, उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती. ते उत्तम वक्ते आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. पण काळजी करून का, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवेन असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना दिलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -