घरमहाराष्ट्रकोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रेल्वे नोकरीतून डावले     

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रेल्वे नोकरीतून डावले     

Subscribe

 कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना  रेल्वे नोकरीतून डावले असून येत्या १५ दिसवात आमच्या मागण्यांवर काही निर्णय झाला नाही तर आम्ही पुन्हा कोकण रेल्वे विरोधात आमरण उपोषणाला बसू सोबतच रेल रोको आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्ताना  सन २००० पासूनच्या अधिसूचनेप्रमाणे परीक्षा दिलेल्या तसेच सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या, प्रकल्पग्रस्त उमेदवारांना कोकण रेल्वेमध्ये नोकरीत जाणुनबुजून डावले आहे. नोकरीत जाणुनबुजून डावल्याने कोकण रेल्वे विरोधात प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी बेलापूर येथील मुख्यालयासमोर सोमावरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र कोकण रेल्वेनी या प्रकल्पग्रस्त उमेदवाराच्या मागण्या ऐकून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे  प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आपले उपोषण १५ दिवसासाठी मागे घेतले आहे.

देशभरातून ६५ हजार उमेदवारांनी दिली होती परिक्षा

२०१८ मध्ये कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी  कोकण रेल्वेने डी ग्रुपची भर्ती काढली होती. सुरुवातीलाही भर्ती फक्त कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी होती. मात्र कोकण रेल्वेनेही भर्ती ओपन गटामध्ये घेण्यात आली होती. या भर्तीत  प्रकल्पग्रस्तांना आरक्षण देऊ केले होते. मात्र या भर्तीची परीक्षा  तब्बल देशभरातून ६५ हजार उमेदवारांनी दिली होती. ज्यामध्ये ५६० प्रकल्पग्रस्त उमेदवार परीक्षे उत्तीर्ण झाले होते. कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले प्रकल्पग्रस्त उमेदवार हे कोकण रेल्वेच्या परीक्षा, कागदपत्रांची छाननी, शारीरिक चाचणी इत्यादी सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन देखील त्यांना कोकण रेल्वेने सामावून घेतले नाही. त्यामुळे कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीने कोकण रेल्वे विरोधात आमरण उपोषणासारखा मार्ग पत्करावा लागला होता. सोमावर पासून कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्य कार्यालय आवाराच्या बाहेर आमरण उपोषण सुरु केले होते. ज्यात मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त परीक्षार्थी सहभागी झाले होते. मात्र, दोन दिवस सुरु असलेल्या आमरण उपोषणानंतर कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परीक्षार्थ्यांची मागणी ऐकून घेतली आणि १५ दिवसाची मुदत मागितली आहे. त्यामुळे हा संप १५ दिवसांसाठी तूर्तासत मागे घेण्यात आला आहे. जर १५ दिसवात आमच्या मागण्यांवर काही निर्णय झाला नाही तर आम्ही पुन्हा कोकण रेल्वे विरोधात आमरण उपोषणाला बसू सोबतच रेल रोको आंदोलन करू, असा इशारा सुद्धा कोकणातील प्रकल्पग्रस्त समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम  यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रेल्वे भरतीसाठी स्थानिक कोकणवासीयांचे उपोषण आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -