घरमुंबईका रे दुरावा? का रे अबोला?

का रे दुरावा? का रे अबोला?

Subscribe

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे दोघे सख्ये मित्र आता एकमेंकांचे राजकीय वैरी झाल्याचे आज पाहिला मिळाले आहे.

का रे दुरावा का रे अबोलाअपराध माझा असा काय झाला? आशा भोसले यांनी गायलेले मुंबईचा जावई या सिनेमातील हे गाणं.. मात्र सध्या दोन राजकारणी मित्रांना पाहिल्यावर हे गाणं डोळ्यासमोर येतं. एक आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे म्हणजे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार. एकेकाळचे हे दोघे सख्ये मित्र आता एकमेंकांचे इतके राजकीय वैरी झालेत की समोरासमोर येऊन देखील यांनी एकमेंकांकडे पाहिले देखील नाही. ख्यातनाम चित्रकार प्राध्यापक प्रल्हाद धोंड यांच्या धवल रेषाया पुस्ताकाच्या प्रकाशनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार मुंबईतील जहाँगिरी आर्ट गॅलरीमध्ये उपस्थित होते. मात्र या दोन मित्रांनी एकमेकांशी बोलणे सोडा पण एकमेकांचा चेहराही या दोघांनी पाहिला नाही.

म्हणून राजआशिष शेलार यांच्यात दुरावा

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ‘, असे म्हणत भाजपावर टीका केली होती. त्याला उत्तर आशिष शेलार यांनी बघाच तो व्हिडिओ‘, असे म्हणत उत्तर दिले होते. एवढेच नाही तर आशिष शेलार यांनी काव्यातून ट्विटरमधून राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हिच टीका राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात असून, त्यामुळेच या दोन सख्या मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंच्या सभांचं झालं काय? हे झालं!


त्या ट्विटमुळे दोघात दुरावा

सोडून गेले नगरसेवकसोडून गेले आमदारएकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी फक्त लढ“, असे म्‍हटले.!! “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे  तसेच शिवाजी पार्काच्या बाबळीला बारामतीची बोरे, अशी खिल्ली देखील आशिष शेलार यांनी उडवली होती आणि हेच राज ठाकरे यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंना विधानसभेसाठी मोठी संधी – प्रकाश आंबेडकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -