घरमुंबई'मरे'वर फुकट्यांची संख्या वाढली; वसूल केले २६ कोटी रूपये

‘मरे’वर फुकट्यांची संख्या वाढली; वसूल केले २६ कोटी रूपये

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवांशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासन वारंवार कारवाई करीत असते. आता तर चक्क मध्य रेल्वे मार्गावरील विनातिकिट प्रवाशांवर एका महिन्यात कारवाई करून २६ कोटी ५ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यावर्षी मे २०१९ मध्ये फुकट्या प्रवाशांमध्ये ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत वाढ

मध्य रेल्वे मार्गावर मे २०१९ मध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ५७ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली. यातून २६ कोटी ५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे मागच्यावर्षी मे २०१८ मध्ये ३ लाख १९ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली होती. यातून प्रवाशांकडून १६ कोटी २६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत दंडाच्या रकमेत मागच्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेच यावर्षीच्या मे महिन्यात ६०.२१ टक्क्यांची भर पडली आहे. तर याच कालावधीत विनातिकिट प्रवाशांची ४३.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- Advertisement -

दहा वर्षांच्या कालावधीत जवळपास ५० कोटींचा दंड

एप्रिल २०१९ ते मे २०१९ या कालावधीत ८ लाख ६९ हजार विनातिकिट प्रवाशांची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यातून तब्बल ४९ कोटी ४७ लाख रूपये दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सातत्याने विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली जाते. प्रवाशांनी योग्य तिकिट काढून प्रवास करणे आवश्यक आहे. यासह प्रत्येक साहित्य बुकिंग करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -